आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करा:अकोल्यात एसटीला फलक लावून मध्यवर्ती बसस्थानकात शिवसैनिकांचे आंदोलन

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजी नगर करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करा, अशी मागणी करत शिवसेनेने मंगळवारी (06 सप्टेंबर) दुपारी आंदोलन केले.

शिवसैनिकांनी मध्यवर्ती बसस्थानकात धाव घेत औरंगबादकडे जाणाऱ्या व औरंगाबाद येथून आलेल्या बसवर छत्रपती संभाजीनगर, असे फलक लावले.

निर्णयाची अंमलबजावणी नाही

महाविकास आघाडीच्या तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात औरंगाबादचे नामांतर संभाजी नगर असे करण्यात आले. मात्र, तेव्हा ठाकरे सरकार अल्पमतात होते. नंतरच्या काळात महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार आले. ठाकरे सरकारच्या काळात नामांतराबाबत घेतलेला निर्णय अल्पमतातील असल्याचा दावा करत पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. औरंगाबादच नाही तर उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्याचाही निर्णय घेण्यात आला. मात्र, तथापि या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही.

आंदोलनात यांचा होता सहभाग

दरम्यान 6 सप्टेंबर रोजी दुपारी शिवसैनिकांनी मध्यवर्ती बसस्थानकात धाव घेत बसवर छत्रपती संभाजी नगर, असे फलक चिटकवले. आंदोलनात अकोला पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा, माजी नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, पंकज जायले, तरुण बगेरे, देवीदास बोदडे, सागर भारूका, लक्ष्मण पंजाबी, संतोष अनासने, रोशन राज, सुनील दुर्गिया, िवजय तिखिले, देवा गावंडे, रूपेश ढोरे,संजय अग्रवाल, अजय बालानी, पंकज सुतवणे, बबलू उके, आकाश राऊत, विक्की ठाकूर आदी सहभागी झाले.

तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याची शिवसेनेची जुनी मागणी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा कायमच करत आले आहेत. त्यामुळे आधीच घेतलेल्या निर्णयाची शिंदे-फडणवीस सरकारने तातडीने अंमलबजावणी कशी होईल, यासाठी प्रयत्न करावेत. केंद्र व राज्यात हिंदुत्ववादी सरकारचा असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत असून, निर्णयाची विनाविलंब अंमलबजावणी करावी, अन्यथा तीव्र आंदोनल करण्यात येईल अशा इशारा श्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा यांनी दिला आहे.

असे केले आंदोलन

  • मध्यवर्ती बस स्थानकात प्रथम औरंगबादकडे जाणाऱ्या बसकडे शिवसैनिकांनी धाव घेतली. या बसवर ऑइल पेंटने छत्रपती संभाजी नगर असे लिहिण्यातआले.
  • त्यानंतर शिवसैनिकांनी आपला मोर्चा औरंगाबादवरून आलेल्या आणि नागपूरकडे जाणाऱ्या बसकडे वळवला. या बसवर छत्रपती संभाजी नगर लिहिलेले फलक बसच्या दर्शनीभागावरील काचावर चिटकवण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...