आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शने:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीची निदर्शने ; कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते

अकोला19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देहूत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण न झाल्याचे पडसाद बुधवारी अकोल्यात उमटले. या प्रकाराचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने निषेध करीत केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली. पुण्याजवळील देहू येथे कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण झाले नाही. ही बाब अतिशय वेदनादायी व राज्याचा अपमान करणारी आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून झाली. त्यांना भाषण करण्यासाठी ‘पीएमओ’ने परवानगी नाकारल्याचेही नेत्यांचे म्हणणे होते. या घटनेचे पडसाद बुधवारी १५ जूनला ठिकठिकाणी उमटत आहेत. दरम्यान अकोल्यात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे चौकातील वाहतूक काही वेळ संथ झाली होती. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला हाेता. आंदोलन महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्या आदेशाने प्रदेश निरीक्षका डॉ.आशाताई मिरगे व विभागीय अध्यक्ष ज्योती खेडेकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष प्रा. जयश्री नवलकार यांनी केले. ही तर दडपशाहीचा देहू येथील कार्यक्रमात विरोधी पक्ष नेत्यांना भाषणाची संधी दिली. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून पालकमंत्री म्हणून अजित पवार व उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचा जाणूनबुजून अपमान केला गेला, असा आरोप राकाँच्या नेत्यांनी केला. ही भाजपच्या केंद्र सरकारची दडपशाही असल्याची टीकाही त्यांनी केली. आंदोनालत. महासचिव विद्या अंभोरे, रूपाली वाकोडे, उपाध्यक्ष सुनीता सावळे, तालुकाध्यक्ष सुनीता ताथोड ,अनिता दिघेकर ,किर्ती नवलकार ,सुषमा राठोड, संज्योती मांगे, कल्पना गवारगुरु ,मेघा पाचपोर ,वनमला इंगळे आदी सहभागी झाल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...