आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या लाभाची माहिती सादर करण्याचा आदेश समाज कल्याण आयुक्तलयाने सहाय्यक आयुक्तांना दिला आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर समाज कल्याण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकलेल्या अनुसुचित जाती नव बौद्ध घटकातील इयता दहावी नंतरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि शैक्षणिक साहित्य स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थी- विद्यार्थिनींकडून अर्ज मागवण्यात येतात. भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या बॉक खात्यात थेट जमा करण्यात येते. मात्र त्रृटीसह लालफित शाहीच्या कारभारामुळेही काही विद्यार्थ्यांना लाभासाठी प्रतिक्षा करावी लागत असल्याचा आरोप होत आहे.
काय आहे आदेशात?; समाज कल्याण आयुक्तालयाने सहाय्यक आयुक्तांना पाठवलेल्या आदेशात काही प्रमुख मुद्यांचा उहापोह केला आहे. त्यानुसार स्वाधार याेजनेची रक्कम शैक्षणिक वर्ग पूर्ण होऊनही अद्याप विद्यार्थ्यांना मिळलेली नसून, याबाबत आयुक्तालयास तक्रारी प्राप्त झाली आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीने आंदाेलन छेडण्याचा इशारा दिल्याचे पत्रात आदेशात नमूद करण्यात आले आहे. योजनेची माहिती २० जूनपर्यंत सादर करण्यात यावी, असेही स्पष्ट करण्यात
आले आहे.
असे आहेत निकष स्वाधार योजनेअंतर्गत काही निकष आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच अकोला मनपा हद्दीपासून ५ किलोमीटरच्या परिसरात असलेली महाविद्यालये, शैक्षणिक संस्थेत इयत्ता ११ वी, १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत असलेल्या आणि शासकीय मागासवर्गीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम देण्यात येते.
ही माहिती करावी लागणार सादर
समाज कल्याण आयुक्तालयाला सन २०१९-२०२०, २०२०-२१, २०२१-२०२२ आणि २०२२-२३ या कालावधीतील माहिती सादर करावी लागणार आहे. यात प्राप्त तरतूद, खर्च, शिल्लक, प्रत्यक्ष लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची संख्या, शिल्लक लाभार्थी अशी मािहती तक्त्यांमध्ये सादर करावी लागणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.