आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताेडगा काढण्याचा प्रयत्न:शालेय पाेषण आहाराचे तूर्तास जानेवारी महिन्यापुरतेच िनयाेजन

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

िजल्ह्यातील बंद असलेल्या शालेय पाेषण आहाराचे िनयाेजन तूर्तास जानेवारी महिन्यासाठीच करण्यात आले आहे. आहाराबाबतचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून, त्यापैकी एका पुरवठादारामार्फत शाळांना तांदूळ वितरीत करण्यात येणार आहे. तांदूळ व्यतिरिक्त अन्य साहित्य व आहार शिजवण्यासाठी शाळांना िनधी देण्यात आला आहे.विद्यार्थ्यांच्या सुदृृढ आराेग्यासाठी शासनाकडून शालेय पाेषण आहार वितरीत करण्यात येताे. केंद्र ६० टक्के तर राज्य सरकारकडून ४० टक्के निधी खर्चाची तरतूद करण्यात येते. निधी-साहित्य राज्यस्तरावरुन जिल्हा आणि त्यानंतर शाळांना पाेहाेचवण्यात येते.

आहार बंद असल्याच्या मुद्द्यावर िज.प.च्य अनेक सभागांमधून चर्चाही झाल्या. विधान परिषदेतील विराेधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आॅक्टाेबर महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन अधिकाऱ्यांना जाबही विचारला हाेता. त्यांनी हे प्रकरण शासनापर्यंत पाेहाेचल्याचेही सांगितले हाेते. दरम्यान हा मुद्दा विधिमंडळाही पाेहाेचल्यानंतर आता आहार वितरीत हाेण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.

बातम्या आणखी आहेत...