आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नेत्र, अवयव दानाविषयी जनजागृती ; गणेश मंडळाची 1937 पासून उत्सवाची परंपरा

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धार्मिक उत्सवाला सामाजिक कार्याची जोड मिळाल्यास अनेक अवघड उद्देश साध्य करून घेता येतात. तरुण समाज गणेश उत्सव मंडळाने याच प्रयत्नातून नेत्रदान आणि अवयवदानाविषयी जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे अनेक परिसरात नेत्रदान व अवयवदानाच्या कार्याला महत्त्वाचा हातभार लागत आहे.

तरुण समाज मंडळाची स्थापना माळीपुऱ्यातील स्थानिकांनी १९३७ मध्ये केली. तत्काळात माळीपुऱ्यातील तरुणांनी मंडळ तयार केले. त्यामुळे मंडळाचे नावही तरुण समाज मंडळ ठेवले. समाजात एेक्य निर्माण व्हावे, हा याचा उद्देश होता. नामदेव निखारे, शंकर निखारे, सूर्यभान पोफळे, महादेव भवाने, विश्वनाथ भवाने, पुंडलिक हिवराळे यांनी मंडळ स्थापित केले. सध्या मंडळाचे कार्य अध्यक्ष कुंदन भवाने, मनीष हिवराळे, अनुप निखाडे, राहूल पोफडे, सुरेंद्र देठे, ओम निखाडे, चेतन निखाडे, कार्तिक हिवराळे, विकी बुंदेले यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. धार्मिक उपक्रमासह मंडळाकडून सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यात परिसरातील नागरिकांचाही उत्तम सहभाग आहे. त्यामुळे मंडळाच्या कार्याला प्रत्यक्ष कृतीची जोड प्राप्त झाली आहे. विविध सामाजिक उपक्रमाच्या जनजागृतीमुळे नेत्रदान, अवयवदानाची चळवळ येथे उभी राहिली आहे.

९० वर्षांच्या आजीचे नेत्रदान
मंडळाच्या कार्यामुळे एका ९० वर्षांच्या आजीचे नेत्रदान करण्यात आले. तसेच परिसरातील अनेक कुटुंबांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे. वृक्षारोपणासह संगोपण, शाडू माती गणेश व रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या जनजागृतीसाठीही मंडळ कार्य करते. याचे फलित म्हणजे या कार्यात अनेक लोकांनी आपला सहभाग नोंदवला आहे.

बातम्या आणखी आहेत...