आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजलसंवर्धन ही काळाची गरज असून, पाणी अडवणे, जिरवणे व साठवणे यासंबंधी आता सर्वांनी जागृत राहिले पाहिजे. पावसाचे पाणी वाहून न जाता जास्तीत जास्त प्रमाणात ते जमिनीत जिरवण्यात यावे, अडवण्यात यावे आणि त्याची साठवणूक करून ते वापरता यावे याकरिता नेहरू युवा केंद्र, अकोला व जिज्ञासा क्लासेस, मूर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने ''''कॅच द रेन'''' या विषयावर पोलीस स्टेशन समोर शुक्रवार बाजारामध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर बसस्थानक मूर्तिजापूर व मूर्तिजापूर तहसील असे शहरातील विविध ठिकाणी पथनाट्य सादर करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
जल संवर्धनासाठी //"रेन वॉटर हार्वेस्टिंग'''' काळाची गरज आहे. भविष्यासाठी आपण पाण्याचे साठे कसे वाचवू शकतो, शोष खड्ड्यांमध्ये पाणी कसे साठविले जाते, छतावरून पडणारे पाणी व त्याचे नियोजन कसे करायचे, जल संवर्धनावर शेतीला पाणी देण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा उपयोग करणे गरजेचे आहे. शेतीला एका वेळेस पाटातून पाणी दिले तर ते माती व गाळ वाहून जाते. परंतु] पूर्ण ठिबक सिंचन पद्धतीने शेतीला पाणी दिले, तर शेतीला पाणी पूरक होते. माती व गाळ वाहून जात नाही आणि शेती खडकाळ होत नाही. तसेच पावसाचे पाणी वाचविण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात या उद्देशाने पथनाट्य सादर करण्यात आले.
पथनाट्यमध्ये उपस्थित असलेले कलाकार सिमा धम्मपाल ढिसाळे, कोमल प्रमोद उईके, सुजाता रंगराव तायडे, पूजा भावेश सदांशिव, समीक्षा मधुकर राऊत, साक्षी संजय गाडगे, गणेश गुलाबराव चौके, सचिन राजू थाटे, मयुर विनोद अलाटे, आकांक्षा संतोष गवई तसेच बालकलाकार जिज्ञासा धम्मपाल ढिसाळे या सर्व कलाकारांनी उत्कृष्ट पथनाट्य सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकले. त्याचबरोबर तालुका कोऑर्डिनेटर रिंकू अनिल भटकर यांनी पथनाट्यामध्ये पाण्याचे महत्व सांगितले. जल है तो कल हैचे नारे देऊन पथनाट्याची शोभा वाढवली. मूर्तिजापूर शहरामध्ये शांततेत व उत्साहात पथनाट्य सादर करून नागरिकांमध्ये जनजागृती केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.