आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर घर तिरंगा अभियान:हिंदू महासभेतर्फ जनजागृती रॅली ; सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण

अकाेला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान उत्साहाने राबवत अखिल भारत हिंदू महासभेतर्फ जनजागृती रॅली काढण्यात आली.अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. डाबकी राेडवरील रेणुका नगरातील वि. दा.सावरकर पुतळा येथून दुचाकी तिरंगा रॅलीचे काढली. ही रॅली हिंदू महासभेचे कार्याध्यक्ष श्रीराम पांडे, ब्राह्मण महासंघाचे कार्याध्यक्ष अमोल चिंचाळे, हिंदू महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष मनीष देशपांडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. रॅलीत पवन जोशी, कोमल जोशी, शिल्पा देशपांडे, काजल रजवैद्य, अमृता सेनाड, कल्याणी देशपांडे, ऋतुजा थोरात, सचिन पाटील, मनीष राठोड, अतुल पाटील, यशोधन गोडबोले, उदय महा, कुशल सेनाड, योगेश कुळकर्णी, दीपक सिरसाट, भूषण व्याघ्राम्बरे, पुरुषोत्तम आगरकर, ऋषभ पाटील, भानुदास देशपांडे, प्रकाश जोशी, गोपाल रजवैद्य, संतोष पीटकरी, अरुण दुधाळकर, नीलेश मोरवाल आदी सहभागी झाले.ज्ञानपीठचे संस्थापक संचालक चंद्रशेखर गाडगीळ, ज्येष्ठ प्राचार्या गिरिजा गाडगीळ यांच्या प्रेरणेतून तसेच संग्राम गाडगीळ, प्राचार्या स्वामिनी गाडगीळ यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना यशश्री प्राप्त झाली. गायनासाठी संगीत शिक्षक देवपूजे व हुडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...