आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप हंगाम:विक्रमी दराने शेतकऱ्यांचा कपाशीकडे ओढा ; बियाण्यांची 9 लाख पाकिटे उपलब्ध

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसल्याने जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना कपाशीने आधार दिला. कापसाला मिळालेल्या विक्रमी दरामुळे यंदा जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र वाढणार आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात कपाशीच्या १ लाख ५५६८७ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी १ लाख ४१ हजार ००१ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली होती. यंदा १ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्राचा लक्ष्यांक ठेऊन कृषी विभागाने नियोजन केले. त्याअनुषंगाने बियाण्याचे ९ लाख पाकिटे उपलब्ध असून, बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभाग सतर्क आहे गत वर्षीच्या हंगामातील कपाशीला प्रति क्विं.विक्रमी १२ हजारांहून जास्त भाव मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांचा ओढा कपाशीकडे राहण्याची शक्यता अधिक आहे. त्याअनुषंगाने कापसाचे वाढीव क्षेत्र पाहता कृषी विभाग नियोजन करत आहे. बाजारात विक्रीसाठी कपाशी बियाणे आले असून, ओलीत असणाऱ्या शेतकरी लागवडीची तयारी करत आहे. खर्चिक पीक कपाशीला गत काही वर्षांपासून गुलाबी बोंडअळीचा फटका बसत आहे. तीन वर्षांपासून अवकाळीतही कपाशी सापडत आहे. दरम्यान हाती आलेल्या मालाला समाधानकारक भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कपाशीकडे पाठ फिरवली होती. मात्र यंदा कपाशीला प्रति क्विं. १२ हजारांहून जास्त दरामुळे यंदा अनेक शेतकरी कपाशीकडे वळणार आहेत, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

बियाण्यांची खरेदी सुरू बोंडअळीचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता हंगामपूर्व कपाशी लागवड टाळण्यासाठी कृषी विभागातर्फे ३१ मे पर्यंत कपाशी बियाणे विक्रीवर निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे १ जूनपासून कृषी सेवा केंद्र आणि शेतकऱ्यांचा कपाशी बियाणे खरेदी विक्री व्यवहार सुरू झाला आहे. त्यामुळे सध्या ओलीताची सोय असणारे अनेक शेतकरी कपाशी बियाणे खरेदी करताना दिसत आहेत. तर अद्याप मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा असल्याने शेतकरी पावसाचा मुहूर्त साधणार असल्याचे विक्रेते सांगतात.

बातम्या आणखी आहेत...