आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंडात्मक कारवाई:बाळापुरात वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; तीन महिन्यात पावणेदोन लाख रुपयांची करण्यात आली दंडात्मक कारवाई

बाळापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाळापूर येथे कारवाई करताना वाहतूक पोलिस.
पोलिसांच्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतूकीचे नियम तोडणाऱ्या चालकांविरुद्द जानेवारी ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत १ लाख ८५,६०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. यातील अनेकांनी हा दंड भरलेला नाही. यापुढे थकीत दंड दहा दिवसांत न भरल्यास संबंधित वाहन जप्त केले जाणार असल्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक जयंत शिंदे, सलीम पठाण यांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या मार्फतीने ई चलान प्रक्रिया सुरु केली आहे. दररोज वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध ई चलान डिव्हाईसच्या मार्फत बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई केली जाते. रस्ते अपघातांत घट येण्यासाठी तसेच वाहतुकीमध्ये शिस्त येण्यासाठी चालकांनी मोटार वाहन कायद्याचे नियम पाळणे आवश्यक आहे. तरीही वारंवार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे.

या कायद्याची परिणामकारकता साधण्यासाठी नियम मोडणाऱ्या वाहन चालक आणि मालकांकडून ई चलानद्वारे केलेल्या कारवाईची तडजोड रक्कम वसूल होणेही आवश्यक आहे. त्यामुळे एका विशेष मोहिमे अंतर्गत यापुढे कारवाईचा दंड थकवणाऱ्यांविरुद्ध वाहनांचे चलान तपासणी केली जाणार असून, दंड न भरल्यास कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...