आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर‎ पुरस्कार डॉ. शिल्पा दंदालेंना जाहीर‎

देऊळगाव महीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ.‎ शिल्पा महेश दंदाले यांना २०१५ - २०१६ या वर्षीचा‎ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर‎ झाला आहे. राज्य शासनाच्या‎वतीने शनिवार, ४ मार्च रोजी या‎पुरस्कारांची घोषणा करण्यात‎ आली. महिला व बाल विकास‎क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या‎ समाजसेविका आणि स्वयंसेवी‎ संस्थांच्या कार्याचा गौरव व्हावा, तसेच या कार्यापासून‎ इतरांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने राज्य शासनाकडून‎ सन १९९६- १९९७ पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी‎ होळकर पुरस्कार प्रदान केला जातो.

राज्यस्तरीय‎ पुरस्काराचे स्वरूप एक लाख एक रुपये रोख,‎ स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे.‎ जिल्हास्तरावर १० हजार एक रुपये, स्मृतिचिन्ह,‎ सन्मानपत्र, शाल व श्रीफळ, विभागस्तरावर २५ हजार‎ एक रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ‎ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.‎

बातम्या आणखी आहेत...