आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापूर्णा सुपरफास्ट पॅसेंजर रेल्वे आणि भाजपचे खासदार संजय धोत्रे यांचे घर बॉम्बने उडवण्याची धमकी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला मंगळवारी रात्री निनावी फोनवरून मिळाल्यानंतर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. मुंबईतील नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाल्यानंतर अकोला पोलिसांनी अकोला रेल्वेस्थानकावर व रेल्वेमध्ये डॉग स्क्वॉडच्या मदतीने शोधमोहीम राबवली. खासदारांच्या निवासस्थानीही तपासणी करून बंदोबस्त वाढवला होता. अकोला पोलिसांनी मोबाइल लोकेशनवरून आरोपीची ओळख पटवून धमकी देणाऱ्या नितीन पाटील नावाच्या तरुणाला ठाण्यातून ताब्यात घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.