आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला स्थानिक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, लहान उमरी येथे आयोजित सावित्रीची लेक गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रा. डॉ. संतोष हुशे, डॉ. संजय निकस लिखित महात्मा पुस्तकाचे थाटात प्रकाशन करण्यात आले. महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा घेणारे हे पुस्तक सर्व वाचकांना व अभ्यासकांना उपयोगी ठरेल, असा आशावाद मान्यवरांनी व्यक्त केला.
राज्यस्तरीय ओबीसी नेते तथा शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. संतोष हुशे व डॉ. संजय निकस यांनी लिहिलेल्या महात्मा या पुस्तकाचे विमोचन प्रसंगी मंचकावर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. अध्यक्षा संगीता आढाऊ, माजी महापौर अर्चना मसने, मीना कवडे, शोभा कल्याणकर, संगीता जोध, संध्या हिवराळे, कल्पना मसने, शुभांगी काळे, रेणुका सिरस्कार, रेखा मुळतकर, कुंदा लोखंडे उपस्थित होत्या.
यावेळी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी माजी आमदार तुकाराम बिडकर, माजी आमदार बळीराम सिरस्कार, ओबीसी नेते प्रा. डॉ. संतोष हुशे, अरुण काळे, माजी नगरसेवक जयंत मसने, उमेश मसने, मनीष हिवराळे, अरविंद घाटोळ, प्रमोद ढोमणे, सदाशिव शेळके, अनिल शिंदे, पंजाबराव वर, संतोष धरमकर, डॉ. संजय निकस, प्रदीप काळे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुयेशा हाडोळे, शारदा धानोकार, तर आभार ज्योती निखाडे यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माया इरतकर यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. स्नेहलता नंदरधने, दीपमाला खाडे, संगीता निखाडे, मीरा मसने, संध्या देशकर, नेहा राऊत यांनी परिश्रम घेतले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.