आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींची ईडीकडून चौकशी प्रकरण:अकोला काँग्रेसकडून मध्यवर्ती बसस्थानकासमोर रास्तारोको

अकोला17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सलग तिसऱ्या दिवशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी केल्याचे पडसाद बुधवारी अकोल्यात उमटले. काँग्रेसतर्फे मध्यवर्ती बस स्थानकासमोर असलेल्या मदनलाल धिंग्रा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली.

केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्रातील मोदी सरकारकडून गैरवापर होत असल्याचा आरोप करीत काँग्रेसने 16 जून रोजी आक्रमक पवित्रा घेतला. नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून गत तीन दिवसांपासून राहुल गांधी यांची चौकशी होत आहे. या प्रकाराचा निषेध करीत दुपारी 2 वाजता काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या स्वराज्य भवन येथे नेते व कार्यकर्ते जमले. काही वेळानंतर त्यांनी समोरच असलेल्या मदनलाल धिंग्रा चौकात धाव घेतली. या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करीत रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या वाहतुकीची कोंडी झाली होती. सिटी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले.

पोलिसांमध्ये वाद

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केल्याने पोलिसांनी अन्य मार्गाने वाहतूक वळवली होती. या वेळी तीन ते चार वाहन चालक व पोलिस व आंदोकांमध्ये वाद झाला. आंदोलकांनी मदनलाल धिंग्रा चौकातून टावरकडे जाणारी वाहतूक रोखून धरली.

तीव्र आंदोलन करणार

बेरोजगारी, वाढत्या महागाईसह देशात अनेक प्रश्न दिवसेंदिवस उग्ररूप धारण करीत आहेत. मात्र, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्राला वेळ नसून, सरकार काँग्रेसच्या नेत्यांवर चुकीच्या पद्धतीने कार्यवाही करीत असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला. बेरोजगारीवर बोलणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून सरकार कार्यवाही करत असल्याची टीका काँग्रेस नेत्यांनी केली. हे प्रकार बंद न झाल्यास काँग्रेस यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही नेत्यांनी आंदोलनादरम्यान दिला.

बातम्या आणखी आहेत...