आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात बनावट देशी दारुच्या कारखान्यावर छापा:लाखो रूपयांचा ऐवज जप्त, बेलूरा खुर्द येथील चौघे जेरबंद

अकोला11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला तालुक्यातील बाळापूर येथे एका राहत्या घरातून पोलिसांनी मद्य साठा जप्त केला आहे. पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. यावेळी बनावट देशी दारूची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला. आणि लाखो रूपयांचा ऐवज जप्त करून चौघांना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कौशल्यपूर्ण नियोजनातून कारवाई

बाळापूर पोलिस उपविभागांतर्गत येणाऱ्या पातूर पोलिसांच्या हद्दीत बेलूरा (खुर्द) येथे बनावट मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार आज मंगळवार २ जुलै रोजी सकाळच्या सुमारास पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी कौशल्यपूर्ण नियोजन करत तडक पथकासह बेलूरा गाव गाठले.

1 लाखांचा माल जप्त

पथकाने बेलूरा येथे आरोपींच्या राहत्या घरी छापा टाकला. यात या ठिकाणी बनावट देशी मद्य तयार करण्याकरिता लागणारे साहित्य स्पीरीट, कच्चा माल स्पिरिट, सर्जिकल स्पिरिट, अल्कोहोल फ्लेवर, रिकाम्या बाटल्या, बुचन, सीलिंग, लेबलिंग, पॅकिंगचे दोन मशीन साहित्य व बनावट देशी दारुच्या आठ पेट्या असा एक लाख रुपयांचा जप्त करण्यात आला आहे.

यांना अटक

या प्रकरणी आरोपी अमोल डाबेराव , बजरंग किसन डाबेराव, दिनेश देवलाल डाबेराव, राहुल सुभाष बरगे सर्व रा. बेलूरा खुर्द या चौघांना अटक करण्यात आली. आरोपींवर विरुद्ध पातूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बनावट दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...