आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात गावरान दारू भट्टीवर धाड:विशेष पथकाची ग्राम लाखपुरी कारवाई; 1 लाख 72 हजार रूपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट

अकोला23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ग्राम नागपूर लाखपुरी येथे बुधवार, 7 सप्टेंबर रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून अवैध गावरान दारू भट्टीवर छापा टाकून दारू भट्टी उध्वस्त केली. तसेच अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करून विक्री करणाऱ्यावर देखील कारवाई केली.

काय आहे प्रकरण?

याबाबत प्राप्त माहितीनुसार ग्राम लाखपुरी येथील पूर्णा नदी जवळ गावरान मोहा हातभट्टीची दारू काढून विक्री करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पत्काला मिळाली. त्यावरून त्यांनी या ठिकाणी पाहणी करून रेड केली. येथे अवैद्य दारूची हातभट्टी आढळून आली. या ठिकाणी करण कैथवास,दीपक सातकुठे, प्रशांत गामोत, सुनील इंगळे, प्रभुदास ढोरे सर्व रा.लाखपुरी व प्रशांत गामोत रा.बुझवाडा हे अवैधरित्या मोहा हातभट्टीची दारू बनवताना मिळून आले.

दारूसाठा जप्त

आरोपी जवळून मोहा 1600 लिटर, गावरान दारू 125 लिटर, गूळ, ड्रम व दारू बनविण्यासाठी लागणार साहित्य असा एकूण 1,72,000 रूपयांचा मुदेमाल जागीच नष्ट करण्यात आला. त्यांचे विरुद्ध पोलिस स्टेशन मूर्तिजापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दुसऱ्या एका कारवाईत आरोपीला अटक

काळ्या रंगाच्या टिव्हिएस गाडीवर अवैध रित्या दारू विक्री करण्यासाठी जात मुर्तीजापुरकडून नागपूर येथे जात असताना लाखपुरी कमान जवळ नाकाबंदी करून एम.एच.30--ए.जे.2651 या क्रमांकाची मोटर सायकल थांबून मोटरसायकल स्वारा जवळ असलेल्या पोतडीची आज दुपारी पाहणी केली, असता त्यामध्ये देशी दारूचे 100 नग आढळून आले. यावरून अर्जुन कैथवास याच्याकडून मोटरसायकल सह 35000 रुपयाचा ऐवज जप्त करण्यात येऊन पुन्हा दाखल करण्यात आला. मूर्तिजापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंदविन्यात आलेला आहे. कारवाई पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकांने केली.

बातम्या आणखी आहेत...