आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्देमाल जप्त:जुगारावर धाड; पाच जणांना अटक, दारू विक्रेत्यावरही कारवाई; मुद्देमाल जप्त

अकोला7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने खदान परिसरातील कवाडेनगर येथे जुगार व दारू विक्रेत्यावर कारवाई करीत एक लाख ४९ हजार ५०० रुपयांचा मुदेमाल जप्त केला. सहा आरोपींना अटक करण्यात आली.

विशेष पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर कवाडे नगर खदान येथे अवैध रित्या दारू बाळगून विक्री करीत विशाल लक्ष्मण ढोकने याला अटक केली. त्याच्याकडून दारुचा २८०० रुपयांचा मुदेमाल जप्त केला. दुसरी कारवाई कवाडे नगर येथे सुरू असलेल्या वरली जुगारावर करण्यात आली. अवैध रित्या जुगार खेळताना आरोपी आढळून आले. आरोपीजवळून एमएच ३० बीजे ५१५१ क्रमांकाची मोटारसायकल, तीन मोबाईल व रोख २१ हजार ७१० रुपये असा एकूण एक लाख ४६ हजार ७१९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत आरोपी मोहम्मद सलीम मोहम्मद हुसेन, अविनाश नामदेव पारसे, मोहम्मद सलीम शेख महबूब आणि पंकज मनोहर करवते या चौघांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांचे पथकाने केली.

बातम्या आणखी आहेत...