आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे फाटक बंद:गर्डर लाँचिंगच्या कामासाठी सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत रेल्वे फाटक बंद

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला-गायगाव मार्गावरील रेल्वे लाईन दरम्यान पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या गर्डर लाँचिंगच्या कामासाठी मंगळवार २०, बुधवार २१, गुरुवार २२ डिसेंबरला सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अकोला-गायगाव रेल्वे फाटक बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय तीन तास रेल्वेलाइन बंद राहणार आहे. त्यामुळे काही गाड्या उशिरा धावण्याची शक्यता आहे.

मागील काही वर्षांपासून डाबकी ते गायगाव दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. येथे भूमिगत रेल्वे लाईन आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी गायगावकडे जाणाऱ्या मार्गावर उड्डाणपूल तयार करण्यात येत आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या आठवड्यात मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे डाबकी-गायगावस्थित रेल्वे फाटक क्र. ३६ ए वाहतुकीसाठी सहा तास बंद राहणार आहे.

तीनही दिवस सकाळी ९ ते दुपारी ३ दरम्यान मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. दरम्यान रेल्वे लाईन तीन तासासाठी बंद राहणार आहे. या काळात महत्त्वाच्या गाड्या नसल्यामुळे रेल्वे सेवा खूप प्रभावित होणार नाही, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...