आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशन जीवन रक्षक:रेल्वे सुरक्षा दलाने 5 महिन्यांत‎ वाचवले 31 जणांचे जीव‎ ; ‘मिशन जीवन रक्षक'' अंतर्गत कामगिरी‎

अकोला‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स अर्थात‎ आरपीएफ कर्मचारी केवळ रेल्वेच्या ‎ ‎ मालमत्तेचेच रक्षण करण्यासाठीच‎ नव्हे तर कर्तव्यावर असलेल्या इतर ‎ ‎ रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेल्वे ‎ ‎ प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठीही ‎ ‎ नेहमीच प्रयत्नशील असतात. मध्य ‎ ‎ रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी‎ ''मिशन जीवन रक्षक'' चा एक भाग ‎ ‎ म्हणून जानेवारी ते मे २०२२ या ‎ ‎ कालावधीत मध्य रेल्वेवर काही‎ वेळा स्वतःचा जीव धोक्यात घालून ‎ ‎ आतापर्यंत ३१ जणांचे प्राण वाचवले ‎ ‎ आहेत.‎ या जीव वाचवणाऱ्या घटनांचे‎ काही व्हिज्युअल प्रिंट आणि ‎ ‎ इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये खूप‎ लोकप्रिय झाले आहेत. तसेच‎ सोशल मीडियावर व्हायरल झाले ‎ ‎ आहेत. या ३१ घटनांपैकी एकट्या‎ मुंबई विभागात १६ जीव‎ वाचवणाऱ्या घटनांची नोंद झाली‎ आहे. भुसावळ आणि नागपूर‎ विभागात प्रत्येकी ६ जीवरक्षक‎ घटना, पुणे विभागात २ जीव‎ वाचवण्याच्या घटनेची आणि‎ सोलापूर विभागात एक जीव‎ वाचवण्याच्या घटनेची नोंद झाली‎ आहे.‎ अशी होती २०२१ ची‎ कामगिरी : २०२१ या वर्षात मध्य‎ रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी ५२‎ प्रवाशांचे प्राण वाचवले त्यापैकी ३५‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ जीव वाचवण्याची प्रकरणे फक्त‎ मुंबई विभागात नोंदवली गेली. रेल्वे‎ संरक्षण दलाच्या या जवानांना‎ प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील‎ गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या‎ वाहतुकीत अडथळा, हरवलेल्या‎ मुलांची सुटका आणि ट्रेन तसेच‎ रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त‎ करणे, प्रवाशांचे सामान परत‎ मिळवणे इत्यादी विविध सुरक्षा‎ आव्हानांचा सामना करावा लागतो.‎ ते प्रवाशांच्या सुरक्षिततेवर बारीक‎ लक्ष ठेवतात.‎ असे वाचवले प्राण‎ बहुतेक प्रकरणांमध्ये सतर्क‎ आरपीएफने अशा प्रवाशांचे प्राण‎ वाचवले आहेत, जे काहीवेळा‎ निष्काळजीपणा करतात आणि‎ धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा‎ उतरताना धोक्याचा सामना‎ करतात. काही वेळा विविध‎ वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा‎ प्रयत्न करताना जीव वाचला आहे.‎ असे वाचवले प्राण‎ बहुतेक प्रकरणांमध्ये सतर्क‎ आरपीएफने अशा प्रवाशांचे प्राण‎ वाचवले आहेत, जे काहीवेळा‎ निष्काळजीपणा करतात आणि‎ धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा‎ उतरताना धोक्याचा सामना‎ करतात. काही वेळा विविध‎ वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा‎ प्रयत्न करताना जीव वाचला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...