आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेल्वे सुरक्षा बलाचे (RPF) कर्मचाऱ्यांनी रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याच्या मुख्य कर्तव्याव्यतिरिक्त, 'अमानत' या ऑपरेशन अंतर्गत गरजू प्रवाशांना मदत करत त्यांचे हरवलेले सामान, मोबाईल फोन, लॅपटॉप, दागिने, रोख इ. यासारख्या मौल्यवान वस्तू प्रवाशांना परत मिळवून दिल्या आहेत. चालू वर्षाच्या जानेवारी ते जून 2022 दरम्यान, ऑपरेशन ‘अमानत’अंतर्गत, आरपीएफ ने सुमारे 1.89 कोटीचे सामान परत करून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईमध्ये सर्वाधिक ऑपरेशन
एकूण 689 प्रवाशांपैकी 354 प्रवाशांचे 1.17 कोटी रुपयांचे सामान एकट्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात परत मिळवण्यात आले. या सामान पुनर्प्राप्ती प्रकरणांमध्ये बॅग, मोबाईल फोन, पर्स, लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.
इतर विभागांची कारवाई अशी
मागील वर्षातही उत्कृष्ट कामगिरी
2021 मध्ये देखील आरपीएफने 1.65 कोटी रुपयांच्या 666 प्रवाशांचे सामान परत मिळवले आहे. यापैकी 383 प्रवाशांचे 1.01 कोटी रुपयांचे साहित्य मुंबई विभागातूनच वसूल करण्यात आले. रेल्वे सुरक्षा दलाच्या या कर्मचाऱ्यांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीला अडथळा इत्यादी विविध सुरक्षा आव्हानांनाही तोंड द्यावे लागते. रेल्वे संरक्षण दलाच्या या शूर सैनिकांच्या कार्याचा सारांश सुरक्षा, सतर्कता आणि सेवा असे करता येईल आणि त्यांनी अत्यंत समर्पण सतर्कतेने आणि धैर्याने आपली कर्तव्ये पार पाडली आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.