आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रद्द झालेल्या गाड्या पूर्ववत:महापरिनिर्वाण दिवशीचा अडथळा दूर; मेगा ब्लॉक रद्द न होता 14 विशेष रेल्वेही धावणार

अकोलाएका दिवसापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव यार्ड रिमॉडेलिंगमुळे रद्द झालेल्या गाड्या रेल्वेने पुन्हा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महापरिनिर्वाणादिवशीचा प्रवासातला अडथळा दूर झालाय.

जळगाव यार्ड रिमॉडेलिंगमुळे रद्द झालेल्या गाड्यांमुळे वातावरण तापले होते. ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनीच या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी विरोध केला होता.

रद्द केलेल्या गाड्या पूर्ववत

- १२११२ अमरावती-मुंबई एक्सप्रेस जेसीओ - ५ डिसेंबर २०२२

- १२१११ मुंबई-अमरावती एक्सप्रेस जेसीओ - ६ डिसेंबर २०२२

- १२१०५ मुंबई-गोंदिया विदर्भ एक्सप्रेस जेसीओ - ४ डिसेंबर २०२२

- १२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ एक्सप्रेस जेसीओ - ५ डिसेंबर २०२२

सेवाग्राम गाडीच्या ठिकाणी

विशेष गाडी क्र. ०१२६६ नागपूरहून ५ डिसेंबर २०२२ रोजी १५.५० वाजता सुटेल आणि ६ डिसेंबर २०२२ रोजी १०:५५ वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल.

गाड्यांचे थांबे असे

अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जळकापूर, जळकापूर, जळगाव, मुर्तिजापूर, चाळीसगाव, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर.

अडथळा दूर झाला

वंचित बहुजन युवा आघाडीने ६ डिसेंबर रोजी गाड्या रद्दच्या निर्णयाबाबत संघर्षाचा पवित्रा घेत आंदोलन करण्याचा इशारा देणारे ई-मेल रेल्वे अधिकारी ह्यांना पाठवले होते. त्यावर गुरुवारी मुंबईमध्ये रेल्वे अधिकारी ह्यांच्या बैठकीत या विषयांवर चर्चा होवून ५ आणि ६ डिसेंबरचा मेगाब्लॉक रद्द न करता रद्द केलेल्या ट्रेन आंबेडकरी अनुयायांसाठी वेळेवर चालविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई येथील रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार ह्यांची दूरध्वनीने दिली, अशी माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी दिली.

त्यांची चौकशी करा

पातोडे म्हणाले की, महापरिनिर्वाण दिनी १४ विशेष रेल्वे देखील सोडणार असल्याने आंबेडकरी अनुयायांना गैरसोय होणार नाही. ब्लॉक असेल मात्र त्याचा कुठलाही परिणाम आंबेडकरी अनुयायांना घेऊन जाणाऱ्या गाड्यावर होणार नाही, असे रेल्वेने कळवले आहे. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे महापरिनिर्वाण दिनाच्या दिवसाचे गांभीर्य न जपणारे ते अधिकारी कोण आहेत आणि सहा डिसेंबरच्या पूर्वसंध्येला हा मेगाब्लॉक का घेण्यात आला होता, ह्याची चौकशी करण्यात यावी आपण ठाम असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...