आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरणात बदल:शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपले; 13 ऑक्टोबरपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला असून, अधूनमधून पावसाची सर कोसळत आहे. तर दिवसा आणि रात्री उकाडा जाणवत आहे. बुधवारी दसऱ्याच्या दिवशी शहर परिसरात काही ठिकाणी पावसाची हलकी सर कोसळली तर गुरुवारी अकोला शहर परिसरासह जिल्ह्याच्या विविध भागात गुरुवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली.

अकोल्यात झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. याशिवाय अनेक वसाहती व सखल भागातील दुकानांमध्ये पाणी साचल्याने व्यावसायिक, नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. सुमारे अर्धा तास पावसाचा जोर होता. त्यानंतर दीड तास रिपरिप पाऊस सुरू होती.

अमरावती येथील हवामान अभ्यासक प्रा. अनिल बंड यांच्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश किनारपट्टीवर ३.१ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. तसेच आंध्र किनारपट्टी ते उत्तरांचल द्रोणीय स्थिती निर्माण झालेली आहे. वातावरणातील या बदलाचा परिणाम म्हणून विदर्भात अनेक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. यामध्ये अकोला, अमरावती व वाशीम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचे प्रा. बंड सांगतात.

अशी आहे शक्यता
७ ते ९ ऑक्टोबर : विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता.
१० ऑक्टोबर : पूर्व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर पश्चिम विदर्भात काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता.
११ ते १३ ऑक्टोबर : विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...