आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:16 ते 19 जूनदरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस ; हवामान विभागाचा इशारा, सतर्कतेचे आवाहन

अकोला19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार १६ ते १९ जून दरम्यान जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस व ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे लक्षात घेवून नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी केले आहे.हवामान खात्याने इशारा दिलेला असल्याने नागरिकांनी काही काळजी घेणे गरजेचे आहे. आपत्ती आल्यास आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज आहे. तसेच आपत्तीची माहिती कक्षात द्यावी,विजा कडाडत असताना नागरिकांनी वीज वादळाची स्थिती जाणवताच टवि्ही, संगणक, इ. विद्युत उपकरणे स्त्रोतापासून (स्वीचबोर्ड मधून) अलग करुन ठेवावीत. वीज वादळाच्या स्थितीत मोबाइलचा वापर टाळावा. घरात वा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. खिडक्या दारे बंद करावीत. झाडाखाली आश्रय घेऊ नये. वाहनावर प्रवास करीत असल्यास वाहन विजेच्या खांबाजवळ वा झाडाखाली थांबवू नये. वीज कोसळल्यास मानवी हृदय व श्वसन प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. अशावेळी हृदयाजवळील भागास मालिश करावे व तोंडाद्वारे श्वसन प्रक्रियेस मदत द्यावी. या कालावधीत सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी,अशा सूचनाही जिल्हाधिकारी अरोरांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...