आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंदाज:विदर्भात पुढील सात दिवस पावसाचा अंदाज ; प्रा. अनिल बंड यांनी दिली माहिती

अकोला19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जूनच्या सुरवातीपासून उन्हाचे चटके सोसणाऱ्या पश्चिम विदर्भाला मान्सूनची प्रतीक्षा आहे. मान्सून अरबी समुद्रातच रेंगाळल्याने त्याच्या आगमनाला विलंब झाला. मात्र ४८ तासात मान्सूनचा पाऊस दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात येण्यास परिस्थिती अनुकूल आहे. त्यानंतर मान्सूनची आगेकुच सुरू राहील, अशी माहिती हवामान अभ्यासक प्रा. अनिल बंड यांनी दिली. जूनच्या पहिल्या आठवड्यात उष्णतेची लाट होती.पूर्व,पश्चिम विदर्भात अनुक्रमे ४६, ४४ अंशांपुढे कमाल तापमानाचा पारा गेला होता. अकोला शहरासह तेल्हारा परिसरात पाऊस अकोला / तेल्हारा | गुरुवारी सायंकाळी तेल्हारा परिसरात पाऊस झाला. दरम्यान अकोला शहरात रात्री ११ च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. तेल्हारा शहरासह काही भागात आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. जोरदार वारा सुटला आणि पावसामुळे परिसरातील वातावरणात गारवा निर्माण झाला. येथे जवळपास पाऊण तास पाऊस झाला. तालुक्यात मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकरी, शेतमजूरांनी शेतीची मशागत सुरु केली. गुरुवारी झालेल्या पावसाने उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला. पाऊस झाल्यानंतर साचलेले पाणी. १४ ते १६ जून : विदर्भात विखुरलेल्या स्वरुपात हलका ते मध्यम पाऊस राहील, असे प्रा. अनिल बंड सांगतात. असे आहेत पावसाचे दिवस... १२, १३ जून : अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळात पाऊस येऊ शकतो. उर्वरीत जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. वाशीम, यवतमाळ, गडचिरोलीत वादळी पाऊस येऊ शकताे. ११ जून : अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियांत मेघगर्जना वीजांसह पावसाची शक्यता आहे. अकोला, बुलडाणा, वाशीम, वर्धा, नागपूर व भंडाऱ्यात तुरळक ठिकाणी पाऊस येऊ शकतो. १० जून : विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. अकोला, गोंदिया, नागपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...