आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वीज बिलांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधल्यानंतर रविवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पलटवार केला. राज ठाकरे यांना सध्या प्रसिद्धीची आवश्यकता असल्याने ते बेफाम आराेप करत सुटले आहेत, अशा शब्दांत पाटील यांनी टीका केली. ठाकरे यांच्या आराेपात अजिबात तथ्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच िवराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे फासे पलटण्याचे विधान गांभीर्याने घेत नसल्याचा टाेलाही पाटील यांनी लगावला.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील राष्ट्रवादी परिसंवाद आणि जलसंपदा विभागांतर्गत येणाऱ्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी अकाेल्यात आले हाेते. बैठक संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य सरकारने टाळेबंदीच्या काळातील दिलेल्या आश्वासनावर घूमजाव केले. या मुद्यावरून राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला हाेता. यावर ठाकरे यांचे आराेप गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे जयंत पाटील यांनी या वेळी सांगितले.
शाळांच्या शुल्काबाबत मार्ग काढणे आवश्यकच
टाळेबंदीमुळे सामान्यांसह खासगी शिक्षण संस्थाही अडचणीत आल्या. त्यामुळे शाळा शुल्क माफ करणे, कमी करणे याबाबत मध्यममार्ग काढणे आवश्यक असल्याचे जयंत पाटील म्हणाले. मी काही दिवसांपासून राज्याच्या दाैऱ्यावर असून, मंत्रिमंडळ बैठकांमधील निर्णयांची माहिती घेताे, असेही ते म्हणाले.
पेट्रोल दरवाढीवर दिलासा देण्याचा प्रयत्न करू : अजित पवार
नागपूर| पेट्रोल डिझेलचे भाव ज्या पद्धतीने वाढत आहेत ते पाहता ते लवकरच शंभरी गाठतील हे स्पष्टपणे दिसत आहे. यातून सर्वसामान्यांना दिलासा देण्याविषयी माझ्या मनात एक निश्चित लाइन ठरलेली आहे. पण, म्हणून मी आजच काही घोषणा करणार नाही. मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर अर्थसंकल्पात या विषयी निर्णय घेता येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
रविवारी नागपुरात बोलताना सांगितले.
सकाळी आठ म्हणजे पहाट होते का? : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेविषयी थेट शरद पवार यांच्याशी बोलणे झाले होते, असे वक्तव्य केले होते. मग माशी कोठे शिंकली, पहाटेचे स्वप्न का भंगले, असा प्रश्न विचारण्यात आला असता अहो, सकाळी ८ वाजता मी शपथ घेतली होती. सकाळी ८ वाजता पहाट कशी होईल, असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी केला. एखादा सूर्यवंशीच सकाळी ८ ला पहाटं म्हणू शकेल. कारण माझा दिवसच सकाळी ६ वाजता सुरू होतो, अशी पुश्तीही त्यांनी जोडली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.