आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Rally This Year On The Occasion Of Ahilya Devi's Birthday; Information Given By The Committee In The Planning Meeting At Murtijapur |marathi News

दिव्य मराठी विशेष:अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त यंदा रॅली; मूर्तिजापूर येथे नियोजन बैठकीत समितीने दिली माहिती

मूर्तिजापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ३१ मे रोजी हर्षोल्हासात साजरी केली जाते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या संकटामुळे अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती उत्सव सार्वजनिकरीत्या साजरा करता आला नव्हता. परंतु, यंदा हा महोत्सव साजरा करण्यासाठी जयंती उत्सव समितीच्या वतीने येथील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नियोजन बैठक घेण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी वासुदेव तांबडे होते. जयंती महोत्सवानिमित्त शहरातून भव्य रॅली तसेच इतरही विविध कार्यक्रमांचे आयोजन व कार्यक्रमासाठी आर्थिक तरतुदीबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य योगिता रोकडे, सुरेश जोगळे, पं. स. सदस्य सचिन दिवनाले यांनी आपल्या वतीने आर्थिक योगदान दिले. बैठकीचे प्रास्ताविक सुनील सरोदे यांनी केले. तर प्रा. दिनकर ईसळ, प्रा. बाळासाहेब सरोदे, प्रा. एल. डी. सरोदे, बाळा शितोळे, आशिष कोल्हे, विष्णुपंत चुडे, निखिल गाढवे, डॉ. अभिजीत मुरळ, राहुल रोकडे, सुनील मोठे, प्रा. जी. बी. जोगळे, श्याम अवघड, उदय अवघड, सचिन दिवनाले, वैभव काळे, संजय जोगळे, श्याम अवघड, संजय शितोळे, अजय शिंदे, रवी मार्कंड, मनीष उघडे, डॉ. शंकर गोरडे, ज्ञानेश्वर नागे, ज्ञानेश्वर तीनघसे, सुनील सरोदे, आशिष कोल्हे, सुधीर डांगे, दिलीप पंडित, नितीन भागवत, संकेत कोल्हे, वामन डांगे, सुधाकर बोरसे, सुभाष उघडे, प्रवीण रोकडे, प्रवीण भागवत, प्रल्हाद राऊत आदींच्या उपस्थितीत विचारविनिमय करण्यात आला. रक्तदान शिबिरासह कार्यक्रमाची रूपरेषा १० तारखेपर्यंत ठरवण्यात येणार आहे. नियोजन बैठकीत अमोल अवघड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रवीण रोकडे यांनी केले. बैठक व्यवस्थेबाबत सहकार्य मयूर रोकडे यांनी केले. आभार नारायण सरोदे यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...