आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार सोहळा:नेपथ्यकार श्याम उमरेकर यांना राम जाधव नाट्य तपस्वी पुरस्कार, सोमवारी पुरस्कार सोहळा; पत्रकार परिषदेत माहिती

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षीपासून सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी हौशी रंगभूमीत आपले आयुष्य वेचणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ रंगकर्मीस ‘राम जाधव नाट्य तपस्वी पुरस्कार’ देण्यात येणार आहे. यंदाचा हा पुरस्कार रंगभूमीची हौशी नाट्याच्या माध्यमातून अविरत सेवा करणारे ज्येष्ठ नेपथ्यकार शाम उमरेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ‘रंगकर्मी राम जाधव नाट्य तपस्वी पुरस्कार २०२२’ सोहळ्याची माहिती देण्यात आली.

सोमवार ४ एप्रिल रोजी सायं. ७ वाजता स्थानिक नवनिर्मित सांस्कृतिक भवन प्रांगण, जुने दिवेकर क्रीडा संकुल, रामदास पेठ येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल वाघ, प्रमुख अतिथी पालकमंत्री बच्चू कडू, आ. रणधीर सावरकर राहितील. जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, आयएफएस अधिकारी प्रशांत राम जाधव, आ. गोवर्धन शर्मा, माजी महापौर विजय अग्रवाल, माजी आ. तुकाराम बिरकड आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या सोहळ्यासाठी विविध समिती गठीत करण्यात आल्या आहेत. पुरस्कार निवड समितीत तुकाराम बिरकड, गजानन नारे, अशोक ढेरे, पुरुषोत्तम आवारे, डॉ. अशोक देशमुख, दिलीप देशपांडे, वंदना मोरे, धनंजय मिश्रा, अभिजित परांजपे, उमेश अलोने कामकाज बघणार आहेत, तर मार्गदर्शन समितीत ज्येष्ठ रंगकर्मी मधू जाधव, अॅड. अनंत खेळकर, रमेश थोरात, डॉ. रावसाहेब काळे, पुष्पराज गावंडे, डॉ. आशा मिरगे, सुधाकर गीते, शत्रुघ्न बिरकड, शशिकांत जोशी, शाहीर वसंत मानवटकर कामकाज बघतील. सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन ज्येष्ठ रंगकर्मी अशोक ढेरे, मधू जाधव, तुकाराम बिरकड, विद्या बनाफर, नीलेश कवळे, मेघा चिकार, मयुरी लकडे, अनंत खेळकर, प्रा. नीलेश जळमकर आदींनी केले.

बातम्या आणखी आहेत...