आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराम उत्सव समितीच्या वतीने स्थानिक गांधी चौक परिसरात रामनवमीत रामभक्तांना एल लाख अकरा हजार एकशे एक रुद्राक्ष वितरित करून विविध उपक्रमाच्या माध्यमातून हा उत्सव साजरा करणार असल्याची माहिती राम उत्सव समितीच्या वतीने गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. गांधी चौक येथील चौपाटी परिसरात ३० मार्चला राम दरबार, अयोध्येचा देखावा. २२ मार्चला गुढीपाडवा उत्सवापासून उपक्रमास प्रारंभ होईल. या दिनी सकाळी १० वा. गांधी चौकात भव्य रुद्राक्ष पूजन सोहळा, नंतर राम उत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. २४ मार्चला महिलांचा गणगौर उत्सव दु. ३ वाजता गणगोर घाट येथे होणार आहे. रविवार, २६ मार्चला गांधी चौक येथील पारंपरिक जागेत भव्य राम दरबार स्थापित करण्यात येणार आहे. ३० मार्चला या रामनवमीच्या दिनी दुपारी १२ वाजता राम जन्मोत्सव. यावेळी बालकांसाठी श्रीराम झाकीची स्पर्धा घेण्यात येणार असून, यात उत्कृष्ट वेशभूषा धारण करणाऱ्या बालकांना आकर्षक पुरस्कार देण्यात येईल. याशिवाय जिल्ह्यातील शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मृतीत अमर शहीद गॅलरी साकारण्यात येईल.
सायंकाळी ७ वाजता गांधी चौकात महाआरती होणार आहे. यात हजारो महिला, पुरुष राम भक्तांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच ११ वेळा हनुमान चालिसाचे सामूहिक पठण करण्यात येणार आहे. महानगराचे सांस्कृतिक व धार्मिक प्रतीक असणाऱ्या या रामनवमी उत्सवात रामभक्त महिला, पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्सव समितीच्या विविध उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. पत्रकार परिषदेला उत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. संतोष हुशे, नितीन खंडेलवाल, महामंत्री भरत मिश्रा, शैलेश खरोटे, महिला संयोजिका सुनीता तिवारीसह पदाधिकारी उपस्थित होते.
२१ विविध मंदिरात रुद्राक्ष वाटप
उत्सवात महानगरातील २१ विविध मंदिरात २२ ते २९ मार्च दरम्यान रुद्राक्ष वाटप होईल. बडा राम मंदिर, तपे हनुमान, गांधी चौक, राणी सती धाम, श्यामबाबा रामदेव बाबा मंदिर, बारा ज्योर्तिलिंग, जगदंबा माता मंदिर उमरी, सिद्धी विनायक मंदिर, गजानन मंदिर कौलखेड, हनुमान मंदिर शिवणी, झनक गुरू सिंधी कॅम्प, राजराजेश्वर, गजानन मंदिर डाबकी रोड, रेणुका माता मंदिर, डाबकी रोड, सप्तशृंगी माता मंदिर, स्वामी समर्थ मंदिर डाबकी रोड, काळा मारोती मंदिर, पोळा चौक येथे वितरण होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.