आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरीकरण, वाढती स्पर्धा, बेरोजगारी, कमी होत चाललेली शेतजमीन आणि बदललेले जीवनमान आदी विविध कारणांमुळे आज संयुक्त कुटुंबपद्धती लोप पावत आहे. अगदी ग्रामीण भागातही संयुक्त कुटुंबावर मर्यादा आल्या आहेत. मात्र अकोला शहरातील श्री राजराजेश्वर मंदिर परिसरातील रहिवासी असलेल्या ९७ वर्षीय रमाबाई मांडेकर यांनी आपली संयुक्त कुटुंबाची परंपरा जपली असून, पाच भावंडांपासून वाढलेला त्यांचा परिवार ३० सदस्यांपर्यंत पोहोचला आहे.
रमाबाई मांडेकर या घराच्या मातोश्री. त्यांची पाच मुले आणि पाच सुनांपासून फुललेले कुटुंबही आजही एकत्रित राहते. कुटुंबाच्या व्यवहारात रमाबाई यांचा सल्ला आजही मोलाचा असतो. ३० सदस्यांच्या मांडेकर परिवाराने मिळून मिसळून राहण्याचा, कुटुंबातील बारिकसारीक कुरबूर, हेवेदावे न ठेवता एकमेकांच्या सुख-दुःखाचा भाग होऊन एकोप्यानं राहण्याचा आदर्श घालून दिला आहे.
कुटुंबातील पाच भावंडे, त्यांच्या पत्नी, मुले, सुना नातू असे हे संयुक्त कुटुंब विविध सण-उत्सव एकत्रपणे साजरे करतात. रमाबाई यांची पाच मुले महादेव, पुरूषोत्तम, गोपाल, रामदास व ज्ञानेश्वर व पाच सुना सीमा, शीला, वर्षा, लताबाई व नंदाबाई यांचा हा परिवार उदरनिर्वाहासाठी आपल्या व्यवसायात लक्ष देऊन असतोच पण विविध कौटुंबिक, सामाजिक कार्यक्रमांमध्ये कुटुंबिय पुढे असतात.
या परिवारातर्फे महिला दिनाचे निमित्त साधून महिलांचा गौरव करण्यात येतो. संयुक्त कुटुंबपद्धती हा कृषी संस्कृतीचा आधार व ओळख आहे. ही ओळख या परिवारानेही जपली आहे. पोळा, गौरी, गणपतीसह विविध उत्सव एकत्रीतपणे वेगळ्या ढंगात साजरे करण्याची परंपराही या परिवाराने कायम ठेवली आहे. पाच भावंडांना मिळून सक्रीय असताना निवडक गटांसाठी बुस्टर अर्थात प्रिकॉशन डोस शासनातर्फे जाहीर करण्यात आले होते. यामध्ये ज्यांना सातत्याने कोविड बाधित रुग्णांच्या संपर्कात किंवा समाजात वावरावे लागते असे, आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर तसेच सहव्याधी असलेल्या ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अधिकची सुरक्षा मिळावी म्हणून प्रिकॉशन डोसच्या मोहिमेला सुरूवात करण्यात आली होती. या वेळी १८ ते ५९ वर्ष वयोगटातील नागरिकांना बुस्टर डोस कधी मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत होता. दरम्यान शासनाच्या घोषणेनुसार १० एप्रिलपासून या वयोगटातील पात्र लाभार्थ्यांना सशुल्क बुस्टर डोस देण्याची मोहिम सुरू झाली. मोहिम सुरू होऊन एक महिना उलटला तरी अकोल्यात एकही खासगी केंद्र सशुल्क बुस्टर डोस देण्यास तयार झाले नाही, अशी माहिती मोहिमेतील वैद्यकीय अधिकारी देतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.