आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन वर्ष कोरोनामुळे रमजान ईद घरात साजरी करावी लागली. परंतु, यावर्षी कोरोना नियंत्रणात आहे. त्यामुळे नागरिकांनी ईद साजरी केली. येथे सकाळी ८ वाजता ईदगाहवर ईदची नमाज अदा केली.
ईद गाहवर जामा मशिदीचे इमाम, खतिब मौलाना अजीज अल्लाह खान यांनी, तर अकोली बेस मनिारा मशीद येथे मौलाना अब्दुल सलाम, मशिद अक्सा खडकपुरा येथे मौलाना एजाज यांनी ईद उल फितरची नमाज अदा केली.शहरात खिडकीपुरा, दहेंड बेस, गुलजारी मशिदमध्ये मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. त्यानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदगाह कमिटीने यावर्षी ईद गाहची रंगरंगोटी केली होती. या वेळी पोलिस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर पिंजरकर, टाऊन पोलिस हे. कॉ. जमदार पोलिस, नागेश वानखेडे आदींनी बंदोबस्त ठेवला होता.
या वेळी नगराध्यक्ष हाजी मेहफूज खान यांनी पोलिसांचे आभार मानले. ईदगाहचे इमाम मौलाना अजीज उल्लाह खान, मुफ्ती साद खान, सबुर खान, मोहम्मद सलीम, हाजी रफिक सेठ, शकील चौधरी, मुफीज खान, मासूम खान, हसन शाह अंनत केदारे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.