आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजित निवासी‎ विशेष शिबिर:रासेयोच्या विशेष शिबिरास खल्याळ गव्हाण येथे प्रारंभ‎

देऊळगावराजा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समर्थ कृषी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय‎ सेवा योजनेच्या वतीने आयोजित निवासी‎ विशेष शिबिरास तालुक्यातील खल्याळ‎ गव्हाण येथे करण्यात आली.‎ दि. २ जानेवारी रोजी जिल्हा परिषद‎ प्राथमिक शाळेत श्री गजानन महाराज‎ कृषी व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष देवानंद‎ कायंदे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते‎ शिबिराचे उद‌्घाटन करण्यात आले.‎ याप्रसंगी कायंदे यांनी शिबिरात सहभागी‎ स्वयंसेवकांनी ग्रामस्थांमध्ये जाऊन‎ त्यांच्याबद्दल माहिती घ्यावी आणि‎ आपल्या कृषी ज्ञानाचा शेतकऱ्यांच्या‎ प्रगतीसाठी उपयोग करावा, असे आवाहन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन‎ मेहेत्रे यांनी महिला सक्षमीकरणाच्या हेतूने‎ कृषी ज्ञानातून काढणी पश्‍चात‎ तंत्रज्ञानाची माहिती प्रत्येक महिलेला‎ व्हावी या दृष्टीने कार्य करावे, असे‎ आवाहन केले. उद्योजक सुजित गुप्ता‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यांनी स्वयंसेवकांनी शासकीय नोकरीवर‎ अवलंबून न राहता स्वतःमधील गुण‎ ओळखून उद्योजक होण्याच्या दिशेने‎ वाटचाल करावी, असे आवाहन यावेळी‎ केले. रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.‎ शुभम काकड यांनी प्रास्ताविक केले.‎ सूत्रसंचालन धनेश ताकवाले यांनी केले.‎ वैष्णवी काटे यांनी आभार मानले.

या‎ कार्यक्रमास सरपंच कविता बद्रीनाथ‎ दंदाले, उपसरपंच शीतल विनोद‎ खंडागळे, शाळा समिती अध्यक्ष रामदास‎ दंदाले, तंटामुक्ती अध्यक्ष दगडुबा‎ शेळके, जिल्हा परिषद शाळेचे‎ मुख्याध्यापक दिनकर कायंदे, पत्रकार‎ मुशीर कोटकर, ग्रामपंचायत सदस्या‎ कौशल्या अशोक दंदाले, अर्जुन‎ गायकवाड, निर्मला शंकर डोंगरे,‎ ग्रामपंचायत सचिव कविता चेके, प्रा.‎ मोहजीतसिंग राजपूत, प्रा. विलास‎ सातपुते, प्रा. लिकेश मेश्राम, प्रा. सचिन‎ सोळंकी, प्रा. देवानंद नागरे, प्रा. श्वेता‎ धांडे व स्वयंसेवक उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...