आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रविवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी, भारतीय विचार मंच विदर्भ व कर्मयोग शिक्षण प्रसारक संस्थेचा कर्मयोगी परिवार यांच्या संयुक्त सहकार्याने नववे विदर्भस्तरीय वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे आयोजन स. ९ ते सायं. ५ या वेळेत वै. सौ. सुनंदाताई शां. बुटे वारकरी शिक्षण विद्यालय आपोती खुर्द येथील सभागृहात करण्यात आले आहे. संमेलनाच्या विविध सत्रातून राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर करण्यात येणार आहे.

मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरीचे जनार्दनपंत बोथे, तर मलकापूर येथील प्राचार्य प्रमोद डोरले यांच्या अध्यक्षतेखाली होईल. प्रथम परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जयंत राजुरकर असतील यात प्रा. डॉ. हरिदास आखरे, शेगाव ‘संतांची परमेश्वर भक्ती’, डॉ. दिनेश खुरगे, नागपूर हे ‘राष्ट्रसंतांची भजने व स्वातंत्र्य आंदोलनाची प्रेरणा’, गुरुकुंज आश्रम मोझरीचे अरविंद राठोड यांचे ‘चरित्र भारत का है धन विशाल भारत का है मन’ विषयांवर विचार मांडतील.

द्वितीय परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र नाईकवाडे, नागपूर हे असतील. यात शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वसुधा वि. देव यांचे ‘व्यक्तीधर्म, समाजधर्म व राष्ट्रधर्म’ गजानन वायचाळ, खामगाव यांचे ‘ग्रामगीतेवरील ग्रामदर्शन’ तर डॉ. सतपाल सोवळे, यवतमाळ यांचे ‘ग्रामगीतेतील जीवन शिक्षण’, शलाका जोशी, मौदा यांचे ‘ग्रामगीतेवरील मातृदर्शन’ विषयावर विचार मांडतील.

दुपारी ४ ते ५ या वेळेत संमेलनाचा‎ समारोप होणार असून, या वेळी‎ संमेलन अध्यक्षांचे मनोगत प्राचार्य‎ प्रमोदराव डोरले व्यक्त करतील‎ तर संमेलन परामर्ष डॉ. अमृता‎ इंदुरकर करणार आहेत. या वेळी‎ प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक‎ कार्यकर्ते श्यामराव आपोतीकर‎ उपस्थित राहणार आहेत. तर‎ समारोपीय भाषण प्रा. डॉ. सुभाष‎ लोहे करणार आहेत.

या‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,‎ उद्घाटन समारंभ संजय‎ गायकवाड, परिसंवाद नितीन‎ अंधारे, परिसंवाद २ प्रा. डॉ.‎ निलीमा शेरेकर तर समारोपीय‎ सुषमा देशमुख करतील, अशी‎ माहिती संमेलनाचे संयोजक,‎ संस्थाध्यक्ष प्राचार्य डॉ. शांताराम‎ गो. बुटे, संयोजक भारतीय विचार‎ मंचचे प्रा. डॉ. सुभाष लोहे,‎ सहसंयोजक डॉ. सतपाल सोवळे‎ संमेलन सहसंयोजक महेंद्र‎ कवीश्वर यांनी दिली.‎

ग्रंथदिंडी, प्रदर्शन, प्रकाशनासह कार्यक्रमांची रेलचेल
साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, जीवन कार्यावरील प्रदर्शन, संमेलनाचे उद्घाटन, ग्रंथ प्रकाशन, दोन परिसंवाद, समारोप आदी कार्यक्रमांचे आयोजन आहे. याप्रसंगी कस्तुरी चॅरिटेबल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. किशोर बुटोले, लेखिका अर्चना देव, हभप ज्ञानेश्वर महाराज तायडे यांच्यासह अनेक कर्तुत्ववान मान्यवरांचा सत्कार करण्यात येईल. कार्यक्रमाला जिल्ह्यातील साहित्यप्रेमी, वाचक, समीक्षक, अभ्यासक रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...