आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामीण व शहरी भागात रेशनकार्ड तक्रारमुक्त गाव अभियान राबवण्यात येणार असून, अभियानादरम्यान शिधापत्रिकेबाबतच्या तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे. हे अभियान सोमवार ११ ते शनिवार ३० एप्रिल दरम्यान राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत संबंधित तहसीलदार हे रास्तभाव दुकानदरांची बैठक घेणार आहेत. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना रेशनकार्डसंबंधी कामासाठी प्रत्येक वेळी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. त्यात वेळ व पैशाचाही अपव्यय होतो, हे टाळण्यासाठी पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून अभियान राबवण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी आदेश जारी केला असून, सोमवार ११ ते शनिवार ३० एप्रिल दरम्यान विशेष मोहिम राबवून रेशनकार्ड संदर्भातील सर्व कामे त्या भागातील रास्तभाव दुकानदार यांच्यामार्फत करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहे.रेशनकार्ड तक्रार मुक्त गाव मोहिम राबवण्याकरता तहसीलदार रास्तभाव दुकानदार याची बैठक घेणार आहेत.
रास्तभाव दुकानदार यांना अभियानाबाबत कार्यपद्धती व्यवस्थितपणे समजावून सांगून योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अभियानामध्ये जे गाव रेशनकार्ड तक्रारमुक्त होईल त्या गावच्या रास्त धान्य दुकानदारांना पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार उत्कृष्ट काम केल्याबाबत पारितोषिक देण्यात येईल.
नाव कमी-जास्त होणार : शिधापत्रिकेतील किंवा कुटुंबातील व्यक्तीची नावे कमी करण्यासाठी अथवा वाढवण्यासाठी रास्तभाव दुकानदार कार्डधारकांकडून अर्ज, मृत्यू नोंदीचा दाखला अथवा जन्म नोंदीचा दाखला, कुटूंबातील सर्वांच्या आधार कार्डची छायांकीत प्रत याप्रमाणे कागदपत्रे प्राप्त करणार आहे. त्यानंतर सर्व कार्डधारकांची यादी करुन तहसील कार्यालयात जमा होणार आहे. दुरुस्त झालेले रेशनकार्ड तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्या समक्ष नागरिकांना वितरीत करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.