आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांदूळ बाजारात विक्री:रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात नेताना जप्त

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्री साठी नेताना पोलिसांनी व पुरवठा विभागाने जप्त केला. पाच लाख तीन हजार तांदळाची किंमत असल्याचे समोर आले. ही कारवाई मूर्तिजापूर एमआयडीसीत केली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मूर्तिजापूर एमआयडीसीत शासकीय धान्य गोदामातील तांदूळ ट्रकमध्ये भरून खुल्या बाजारात विक्री साठी नेला जात आहे. अशा माहितीवरून पुरवठा विभाग, पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. असता ट्रक जप्त केला. त्यात २९६ क्विंटल तांदूळ होता. पोलिसांनी ट्रक आणि तांदूळ असा मिळून २५ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ट्रकचालक आरोपी आसीफ उर्फ नसीब खान वय २१ रा. जुनी वस्ती मूर्तिजापूर व ट्रक मालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...