आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रीडा विकास संस्था नागपूर द्वारे आयोजित दहावी कलाताई तिरपुडे राज्यस्तरीय महिला फुटबॉल स्पर्धा नागपूर येथे झाली. यामध्ये आरडीजी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तृतीय स्थान पटकावले. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातील महिला संघ सहभागी झाले होते. ही स्पर्धा झोपडपट्टी फुटबॉल म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व खेळाडू झोपडपट्टीतील रहिवासी होते.
या स्पर्धेचा उद्देश खेळाच्या माध्यमातून शिक्षणाची आवड निर्माण करणे आणि मार्गापासून भरकटलेल्या मुलांना सुधारणे असा आहे, असे स्लम सॉकर प्रा. विजय बारसे यांनी सांगितले. प्रा. विजय बारसे यांच्या कार्याने प्रेरित होऊन बॉलीवूडने प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित झुंड या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ही फुटबॉल क्षेत्राकरता गौरवाची बाब आहे. या राज्यस्तरीय फुटबॉल महिला स्पर्धेत अकोल्यातील श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयातील आरडीजी स्पोर्ट्स अकादमीच्या फुटबॉल संघाने सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवून फेअरप्ले करंडक पटकावला आहे. विद्यार्थिनींना फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण कोच रवीप्रकाश सांगेकर यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले होते.
या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींचे संस्थेतर्फे अभिनंदन करण्यात आले. मुलींच्या संघात विशाखा नेंधणे, अनुष्का सातव, आरती पाटील, कल्याणी अंभोरे, गायत्री मेश्राम, वृशाली भिरड, रोहिणी अहिर, नेहा धनगावकर, मनीषा धायत, स्नेहा पातोंडे आदींचा समावेश होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.