आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासनांवर बोळवण:रेल्वे स्टेशनसमोरील प्रवेशद्वार पुन्हा उभारा; अयोध्येसाठी गाडी सुरू करा; ठाकरे गटाचे ठिय्या आंदोलन

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ,

रेल्वे स्टेशनसमाेरील दाेन्ही प्रवेशद्वार पुन्हा उभारण्यात यावेत आणि अयाेध्येसाठी रेल्वे सुरू करण्यात यावी, या मागण्यांसाठी ठाकरे गटाकडून बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. प्रवेशद्वार उभारण्याचे काम तातडीने करण्याचे आश्वासन रेल्वे विभागाकडून देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

याआधी रेल्वे प्रशासनाने कमान पुन्हा उभारण्याचे आश्वासन दिले हाेते . मात्र ते हवेत विरल्याने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले होते. यवेळी पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा, राहुल कराळे, नितीन ताकवाले, अतुल पवनीकर, मुकेश मुरूमकार, मंगेश काळे ,तरुण बगेरे, संतोष अनासने, ,शरद तुरकर गजानन बोराळे, युवा सेनेचे अभय खुमकर,नितीन मिश्रा आदी उपस्थित हाेते.

काय आहे निवेदनात

  • शिवसेनेकडून मध्य रेल्वेच्या अकाेला प्रबंधकांना पत्र दिले. त्यानुसार रेल्वे स्टेशनच्या एका प्रवेशाद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज तर दुसऱ्या द्वाराला भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले हाेते. मात्र दुरुस्ती कामाच्या वेळी द्वार काढण्यात आले. हा हे द्वार तातडीने उभाण्यात यावे, असेही पत्रात नमूद केले आहे.
  • रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना शिवसेनेकडून पत्र पाठविण्यात आले आहे. त्यानुसार पूर्णा-अकाेला मार्ग ब्राॅडगेज झाला आहे. या मार्गावरून अनेक गाड्या धावत आहेत. लवकरच अयाेध्या येथे भव्य श्रीराम मंदिर साकरण्यात येणर आहे. त्यामुळे सर्व भक्तांना प्रभु श्रीरामाचे दर्शन घेता यावे, यासाठी नांदेडपासून अयाेध्या मार्गे पूर्णा, हिंगोली वाशीम, अकाेला, खंडावा, जबलपूर, सिक्री अशी रेल्वे सुरू करण्यात यावी, असेही पत्रात नमूद केले आहे.
  • रेल्वेकडून आंदाेलकांना गेटबाबत लेखी आश्वासन देण्यात अले. गेटच्या कामांची निविदा प्रक्रिया डिसेंबर 2022 मध्ये झाली आहे. एका महिन्यात निर्माण कार्य हाेईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

असे केले आंदोलन

  • कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांसाठी रेल्वे स्थानकाकडे जाण्याचा प्रयत्न केला. पाेलिसांनी त्यांना थांबवले. त्यानंतर ठाकरे गटाने रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले.
  • आंदोलकांनी हातात प्रभु श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा घेतल्या हाेत्या. कार्यकर्त्यांनी कमान उभारणी व अयाेध्यासाठी रेल्वे सुरू करणे, या मागणीचे फलक धरले हाेते.