आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मेलोडीज ऑफ अकोला’चा अभूतपूर्व उपक्रम:सलग 75 तास देशभक्तीपर गाणे म्हणत केले रेकॉर्ड

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रशासकीय अधिकारी, व्यापारी, डॉक्टर्स, सनदी लेखापाल, अभियंते यांच्या मेलोडीज ऑफ अकोला या ग्रुप स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला. सलग 75 तास या ग्रुपने देशभक्तीपर गायन केले. त्यांच्या या गायनाचा अकोल्यात पहिल्यांदाच रेकॉर्ड झाला आहे.

सुरुवातीला मेलोडीज ऑफ अकोलाचे अ‌ॅडमिन मनोज चांडक यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली. त्यानंतर मेलोडीजचे सदस्य तसेच निवासी जिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, अकोला शहर पोलिस उपअधीक्षक सुभाष दुधगावकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिमचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके यांचेसह सीए मनोज चांडक, अजय सेंगर, संतोष अग्रवाल, महेंद्र खेतान, जयप्रकाश राठी, संजय पिंपरकर, राजेश पूर्वे, निधी मंत्री, मंजिरी अग्रवाल, रवी खंडेलवाल, सीए विक्रम गोलेच्छा, दीपक चांडक, अतुल आखरे, महेश अरोरा यांनी सतत 75 तास देशभक्तीपर सामूहिक गायन केले.

‘मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती, मेरे देश की धरती’ या गाण्यावर उपस्थितांनी ठेका धरला. पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

अ‌ॅड. पावस सेंगर यांनी ‘माँ तुझे सलाम’ या गाण्याला उपस्थितांनी दाद दिली. प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे यांनी अशा प्रकारचा पहिलाच कार्यक्रम असल्याचे सांगून अभिनंदन केले. डॉ. कैलास लहरिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सहभागी मेलोडीजना स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले.

कार्यक्रमाला शहरातील देशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हिरेन जोगी, पंकज लदनिया, सुमित अलीमचंदाणी, भूषण जाजू, शंकर गांधी, रमेश गोलेच्छा, एस. एस. लोहिया, नीरज बोरा, पंकज अग्रवाल, आदित्य मोहता या सनदी लेखापालांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन अजय सेंगर व राजेश पूर्वे यांनी केले. मेलोडीज ऑफ अकोलाच्या सदस्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाने देशप्रेमाचे वातावरण तयार झाले होते.

डीवायएसपी, उपजिल्हाधिकाऱ्यांचे गायन

विशेष म्हणजे या मेलोडी ग्रुपमध्ये उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, डीवायएसपी सुभाष दुधगावकर, अ‌ॅन्टी करप्शनचे डीवायएसपी गजानन शेळके यांच्यासह प्रशासनातील अधिकारी आहेत. या सर्वांनी 75 तास देशभक्तीपर गाणे गायले आणि श्रोत्यांना मंत्रगुग्ध केले.

बातम्या आणखी आहेत...