आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णांची सेवा:कोविडमध्ये काम करणाऱ्यांनाच सुपर स्पेशालिटीमध्ये नियुक्ती द्या

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात कार्यरत अनुभवी व पात्र कामगारांना सुपर स्पेशालिटी रुग्णालया कंपनीने प्राधान्याने नियुक्ती द्यावी, अशी मागणी अ. भा. सफाई मजदूर काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्याची माहिती संघटनेने दिली आहे.

संघटनेने म्हटले आहे की, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सुरू होणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, कोविड-१९ मध्ये कामगारांनी रुग्णांची सेवा केली. कोविड नियंत्रणात आल्यानंतर अल्पशा वेतनावर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या विविध विभाग प्रमुखांना कामावरून कमी करण्यात आले आहे. शासनाने कोविडमध्ये सेवा देणाऱ्यांना कायम करा असा आदेश काढला आहे.

मात्र त्या आदेशाकडे पद्धतशीरपणे कानाडोळा करून सर्व कंत्राटी कामगार, कर्मचाऱ्यांना कामावरून बंद केले आहे. ही बाब निश्चितच अयोग्य व विसंगत आहे. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने कामगार नेते पी. बी. भातकुले, अनुप खरारे यांनी ही बाजू अधिक उचलून धरली. त्यामुळे ज्यांनी कोविडमध्ये काम केले अशा सर्व अनुभवी व पात्र कामगारांना नव्याने सुरू होणाऱ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये कंपनीने प्राधान्याने नियुक्ती द्यावी.

जिल्हाधिकारी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांनी या मागणीची दखल घेऊन कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे आदेशित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास १० ऑगस्ट २०२२ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करून अशी भूमिका कामगार नेते पी. बी. भातकुले प्रदेश महामंत्री तसेच अनुप खरारे कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, मनोज आर निंधाणे, श्री. सारवान यांनी जाहीर केली आहे.

बातम्या आणखी आहेत...