आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:दिव्यांग उमेदवारांकरीता गुरुवारी‎ होणार 32 पदांसाठी भरती प्रक्रिया‎

अकोला5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व‎ उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,‎ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण‎ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने‎ गुरुवारी १० नाेव्हेंबरला दिव्यांग‎ उमेदवारांकरीता पंडीत दीनदयाल‎ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे‎ आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय‎ परिसरात आयोजित करण्यात आले‎ आहे. या मेळाव्यात ३२ पदांसाठी‎ दिव्यांगाची भरती प्रक्रिया राबविली‎ जाणार आहे.

तरी इच्छुक‎ पात्रताधारकांनी या मेळाव्यात‎ सहभागी व्हावे, असे आवाहन‎ जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी‎ केले आहे.‎ पंडीत दीनदयाल उपाध्याय‎ रोजगार मेळाव्याचे आयोजन‎ गुरुवारी १० नाेव्हेंबरला सकाळी ११ ते‎ दुपारी ३ या वेळात करण्यात आले‎ असून जिल्हाधिकारी कार्यालय‎ परिसरात हा मेळावा होणार आहे.‎ इच्छुक पात्र उमेदवारांनी आपल्या‎ बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे,‎ आधारकार्ड, पासपोर्ट फोटो सह‎ स्वखर्चाने उपस्थित रहावे. अधिक‎ माहितीसाठी जिल्हा कौशल्य‎ विकास, रोजगार उद्योजकता‎ मार्गदर्शन केंद्र अकोला या‎ कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक‎ 0724-2433849 व भ्रमणध्वनी‎ क्रमांक 9665775778 या‎ क्रमांकावर संपर्क साधावा, असे‎ आवाहन करण्यात आले आहे,‎ अशी माहिती एका प्रसिद्धी‎ पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...