आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रसायनांच्या वापराने रेड वेलवेट माईट धोक्यात ; फुलपाखरांसह विविध कीटकांवर परिणाम

अकोला13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मृग नक्षत्रातील पहिला पाऊस झाला की, ओल्या मातीवर चालणारे मखमली व गर्द लाल रंगाचे मृगाचे किडे अर्थात रेड वेलवेट माईट लक्ष वेधून घेतात. धोक्याची जाणीव होताच पाच मिटवून बसणारे हे कीडे अलिकडे क्वचित दिसतात त्यामुळे शेतीतील रसायनांच्या वाढत्या वापराचा अन्नसाखळीवर परिणाम होत असल्याचे अभ्यासक सांगतात.

पावसाळ्याचा सुरुवात झाली की, अनेक सुक्ष्म जीव मातीतून वर येतात. साप, सरडे, बेंडूक आणि पाली यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात त्यामुळे पहिल्या पावसानंतर वर येणारे कीडे अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहेत. मात्र गेल्या काही वर्षात शेतीत कीटकनाशके आणि तणनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला. शिवाय पिकपद्धतीत अमुलाग्र बदल होऊन मिश्र पिक पद्धती शिवारांमध्ये संपुष्टात येत आहे. परिणामी फुलपाखरांसह अनेक लहान किडे धोक्यात येत आहेत.

जून महिन्यात पहिला पाऊस झाला की पेरणीपूर्वी मृगाचे लाल कीडे दिसून येतात. हा कीडा धोक्याचा स्पर्ष होताच आपण जणू निर्जीव असल्याचे भासवतो. पुन्हा काही वेळाने पाय मोकळे करून चालायला लागतो. कुजलेल्या पानांचे बारीक कण, केरकचऱ्यामधून तयार झालेले सुक्ष्मजीव हे रेड वेलवेट माईटचे मुख्य खाद्य असल्याचे अभ्यासक सांगतात. ते अत्यंत कमी दिवस जमिनीवर आढळतात. अंडी घालतात अन् मरून जातात.

बातम्या आणखी आहेत...