आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:"वीज भारनियमन कमी‎ करा, अन्यथा आंदोलन''‎; अधीक्षक‎ अभियंता यांना दिलेल्या निवेदन

अकोला‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या विविध भागात पाच ते‎ सहा तास भारनियमन सुरु आहे.‎ भारनियमनाची माहितीही दिली जात‎ नाही. त्यामुळे या अघोषित‎ भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले‎ आहेत. हे भारनियमन कमी करावे‎ अन्यथा धरणे आंदोलन केले‎ जाईल, असा इशारा माजी महापौर‎ मदन भरगड यांनी महावितरणला‎ दिला आहे. महावितरणचे अधीक्षक‎ अभियंता यांना दिलेल्या निवेदनात‎ मदन भरगड यांनी म्हटले आहे की,‎ गीतानगर ,अकोला येथील कलश‎ सुपरशापी समोरील इलेक्ट्रिक पोल‎ हटविण्याचे व्यक्तिगत कामा करिता‎ या भागाची इलेक्ट्रिक लाइन ५ तास‎ बंद करून काम करण्यात येत आहे.‎ यामुळे नागरिकांना त्रास सहन‎ करावा लागत आहे. विशेषत: ज्येष्ठ‎ नागरिक, रुग्णांना अधिक त्रास‎ सहन करावा लागतो. त्यामुळे‎ दुरुस्ती अथवा भारनियमन करताना‎ त्याचे तास कमी करावे. दोन ते‎ अडीच तास लाइन बंद करून‎ महावितरणने दुरुस्तीची कामे‎ करावीत. यापुढे पाच तास सलग‎ विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास‎ त्याच ठिकाणी नागरिक धरणे‎ आंदोलन करतील. त्याची सर्वस्व‎ जवाबदारी महावितरण ची राहील,‎ ही बाब लक्षात घेवून भारनियमन‎ निश्चित करावे, अशी मागणी‎ माजी नगरसेवक मदन भरगड यांनी‎ केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...