आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Akola
 • Registration Of 2 Lakh 12 Thousand 785 Farmers In 'PM' Kisan Samman Yojana District; Many Farmers Do Not Have Bank Accounts Attached

‘पीएम’ किसान सन्मान योजना:जिल्ह्यात 2 लाख 12 हजार 785 शेतकऱ्यांची नोंदणी; अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते संलग्नित नाही

अकोला24 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

जिल्ह्यातील 77 हचार 277 हजार 14 शेतकरी लाभार्थ्यांची ई-केवायसी रखडली आहे. आतापर्यंत 2 लाख 12 हजार 885 खातेदारांची खाती आधार संलग्नित झाली आहे. ई-केवायसी न झालेल्या संबंधित शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत (पीएम-किसान) मिळणाऱ्या लाभापासून वंचित रहावे लागू शकते. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी सात सप्टेंबरपूर्वी त्यांचे बॅंक खाते आधार क्रमांकासोबत संलग्न करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील सिमांत तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी लाभ देणारी सर्वात महत्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरणाच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असल्याने शेतकऱ्यांना त्वरित या पैशांचा वापरही करता येतो. सरकारने या योजनेचा लाभ देशातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जिल्ह्यातील जवळपास दोन लाख 12 हजार 685 शेतकऱ्यांनी पीएम-किसान योजनेसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 77 हजार 277 शेतकऱ्यांचे बॅंक खाते आंधार संलग्न करणे बाकी आहे.

अशी पूर्ण करावी प्रक्रिया

पी.एम.किसान पोर्टलवर स्वतंत्र ई-केवायसी टॅब असून सदर टॅबमध्ये क्लिक करून पी.एम. किसान लाभार्थ्यांनी आधार क्रमांक टाकून त्यानुसार ओ.टी.पी. प्राप्त हाेणार आहे. ओ.टी.पी. पुन्हा पी.एम. किसान पोर्टलवर टाकावा. या माध्यमातून आधार तपासणी होऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. नजीकच्या सीएससी आपले सरकार केंद्रावर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, असे जिल्हा प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

माहिती अचूक भरा

निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी यापूर्वीच्या बैठकित संबंधितांना सूचनाही िदल्या हाेत्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेशी संबधित लाभार्थ्यांची माहिती भूमी अभिलेख दस्तावेजानुसार अचूक भरावी.लागणार आहे

असे मिळाले शेतकऱ्यांना मानधन

 • पहिला हप्ता - 2 लाख 22 हजार 931
 • दुसरा हप्ता - 2 लाख 19 हजार 214
 • तिसरा हप्ता - 2 लाख 18 हजार 404
 • चौथा हप्ता - 2 लाख 10 हजार 280
 • पाचवा हप्ता - 2 लाख 8 हजार 280
 • सहावा हप्ता - 2 लाख 2 हजार 887
 • सातवा हप्ता - 1 लाख 90 हजार 822
 • आठवा हप्ता - 1 लाख 75 हजार 577
 • नौवा हप्ता - 1 हजार 33 हजार 760
 • दहावा हप्ता - 1 लाख 22 हजार 94
 • अकरावा हप्ता - 69 हजार 295
बातम्या आणखी आहेत...