आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संलग्नित हाेणे बाकी:पीएम किसान सन्मान याेजनेत दाेन लाख 12785 शेतकऱ्यांची नाेंदणी

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील ७७ हचार २७७ हजार १४ शेतकरी लाभार्थ्यांची ई-केवायसी रखडली आहे. आतापर्यंत २ लाख १२ हजार ८८५ खातेदारांची खाती आधार संलग्नित झाली आहे. ई-केवायसी न झालेल्या संबंधित शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत (पीएम-किसान) मिळणाऱ्या लाभापासून वंचित रहावे लागू शकते. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी सात सप्टेंबरपूर्वी त्यांचे बॅंक खाते आधार क्रमांकासोबत संलग्न करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील सिमांत, अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी लाभ देणारी महत्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजारांचा लाभ दिला जातो. शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरणाच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असल्याने शेतकऱ्यांना त्वरित या पैशांचा वापरही करता येतो. सरकारने या योजनेचा लाभ देशातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जिल्ह्यातील जवळपास दोन लाख १२ हजार ६८५ शेतकऱ्यांनी पीएम-किसान योजनेसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ७७ हजार २७७ शेतकऱ्यांचे बँक खाते आंधार संलग्न करणे बाकी आहे.

पी.एम.किसान पोर्टलवर अशी पूर्ण करावी प्रक्रिया
पी.एम.किसान पोर्टलवर स्वतंत्र ई-केवायसी टॅब असून, या टॅबमध्ये क्लिक करून पी.एम. किसान लाभार्थ्यांनी आधार क्रमांक टाकून त्यानुसार ओ.टी.पी. प्राप्त हाेणार आहे. ओ.टी.पी. पुन्हा पी.एम. किसान पोर्टलवर टाकावा. या माध्यमातून आधार तपासणी होऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. नजीकच्या सीएससी आपले सरकार केंद्रावर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, असे जिल्हा प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...