आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावीटभट्टी व्यावसायिकांना आवश्यक परवाना सहज व त्वरित मिळेल, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना राबवण्यात याव्यात,’ असा आदेश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शनविारी दिला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा घेतला. वीटभट्टी वैध करून घेण्यासाठीच्या ७० अर्ज छाननीसाठी सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयाकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (एमपीसीबी) सादर करण्यात आले. लवकरच छाननीनंतरच चित्र स्पष्ट होणार असून, डॉ शिंगणे यांच्या नवीन आदेशानंतर महामार्गलगतच सुरू असलेल्या वीटभट्टयांवरकोणती कार्यवाही होणार हे पाहणे आैत्सुक्याचे राहणार आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर ठिकठिकाणी वीटभट्ट्या आहेत. मात्र अनेक ठिकाणी प्रदूषणासह अन्य नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येते. वीटभट्टींच्या परवानगीसाठी पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, याकरता पर्यावरण विभागाची अनुमती असणे बंधनकारक आहे. याबाबत राज्य शासनाने सन २०१६मध्ये अधिसूचनाही जारी केला होता. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने मार्च २०२२मध्ये आदेश जारी करून सूचनाही केल्या होत्या.
त्यानंतर सर्व तहसीलदारांदाकडे वीटभट्टी मालकांनी अर्ज केले होते. दरम्यान शनविारी अकोल्यात अन्न व औषध प्रशासन मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी अकाेल्यात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत वीटभट्यांना सहन त्वरीत परवाना मिळेल, यासाठी उपाय योजना करण्याचा आदेश दिला. बैठकीला आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी नीमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, नविासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मनपा उपायुक्त पंकज जवजाळ, अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त सागर तेरकर, वनिय सुलोचने, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, माजी आमदार हरिभाऊ भदे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. आशा मिरगे आदी उपस्थित होत्या.
नियमांना तिलांजली
वीट भट्टी गावठाणापासून ८०० मीटर अंतराचे आत असणे, भट्टी राष्ट्रीय व राज्य मार्ग, रेल्वे मार्गापासून २०० मीटर असणे, दोन वीट भट्टींमध्ये १ कि.मी.चे अंतर असणे आवश्यक आहे. मात्र बाळापूर, अकोट रोडवर अनेक ठिकाणी रस्त्यालगत भट्टी सुरू आहेत. वीटभट्यांवर धुळ न होण्यासाठी चिमणीही बसवणे आवश्यक आहे. मात्र बहुता:श ठिकाणी चिमणीच नाही.
पावसाळ्यात कारवाई?
जिल्ह्यात वीटभट्टी व्यावसायिकांना अर्ज करण्यासाठीची मुदत दाेन वेळा वाढवली होती. अखेरची मुदत ३० एप्रिलपर्यंत होती. तहसीलदारांना प्राप्त अर्ज त्यांनी छाननीसाठी एमपीसीबीकडे वर्ग केले. छाननीनंतर जिल्हा खनीकर्म विभाग कार्यवाहीचा निर्णय घेईल. मात्र पावसाळा सुरू होणार असून, वीट भट्यांवर पावसाळ्यात कार्यवाही होणार काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.