आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फलक:औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजी नगर करा; शिवसेनेने बसला लावले फलक

अकाेला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजी नगर करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करा, अशी मागणी करीत शिवसेनेने मंगळवारी आंदाेलन केले. शिवसैनिकांनी मध्यवर्ती बस स्थानकात औरंगबादकडे जाणाऱ्या व औरंगाबाद येथून आलेल्या बसवर छत्रपती संभाजी नगर, असे स्टिकर लावले व एका बसवर तर रंगानेही लिहिले.

महािवकास आघाडीच्या तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात औरंगाबादचे नामांतर संभाजी नगर असे करण्यात आले. मात्र तेव्हा ठाकरे सरकार अल्पमतात हाेते. नंतरच्या काळात महािवकास आघाडी सरकार काेसळ्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. ठाकरे सरकारच्या काळात नामांतराबाबत घेतलेला निर्णय अल्प मतातील असल्याचा दावा करीत पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केला हाेता. उस्मानाबादचे नावही धाराशिव केले करण्याचाही मिर्णय घेतला. मात्र यानिर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. ६ सप्टेंबरला शिवसैनिकांनी मध्यवर्ती बस स्थानकात बसवर छत्रपती संभाजी नगर, असे स्टिकर चिटकवले. आंदाेलनात अकाेला पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा, माजी नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, पंकज जायले, तरूण बगेरे, देवीदास बाेदडे, सागर भारूका, लक्ष्मण पंजाबी , संताेष अनासने, राेशन राज, सुनील दुर्गिया,विजय तिखिले, रूपेश ढाेरे,संजय अग्रवाल, अजय बालानी, पंकज सुतवणे, बबलू उके, आकाश राऊत, िवक्की ठाकूर सहभागी झाले.

...तर तीव्र आंदाेलन ः औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतराची शिवसेनेची जुनी मागणी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा कायमच करत आले आहेत. त्यामुळे आधीच घेतलेल्या िनर्णयाची आताच्या शिंदे-फडणवीस सरकारने अंमलबजावणी कशी हाेईल, यासाठी प्रयत्न करावेत. केंद्र व राज्यात िहंदुत्ववादी सरकारचा असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांनी या मिर्णयाची अंमलजावणी करावी; अन्यथा आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे अकाेला पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा यांनी आंदाेलनादरम्यान दिला.

असे केले आंदाेलन ः मध्यवर्ती बस स्थानकात औरंगबादकडे जाणाऱ्या बसकडे शिवसैनिकांनी धाव घेतली. या बसवर पेंटने छत्रपती संभाजी नगर असे लिहिले शिवसैनिकांनी माेर्चा औरंगाबादवरून आलेल्या, नागपूरकडे जाणाऱ्या बसकडे वळविला. यावर छत्रपती संभाजी नगर लिहिलेले स्टिकर बसच्या दर्शनीभागावरील काचावर चिटकवले.

बातम्या आणखी आहेत...