आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन:आव्हाडांच्या अटकेचे पडसाद; घोषणा देत रायुकाँचे आंदाेलन

अकाेला5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची अकोल्यात शनिवारी पडसाद उमटले. ठाणे येथे झालेल्या कारवाईच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे मदनलाल धिंग्रा चाैकात (मध्यवती बस स्थानक) रास्ता राेकाे आंदाेलन करण्यात आले. तसेच आंदाेलकांनी घोषणा देत कारवाईचा निषेधही नाेंदवला.

ठाणे येथील मॉलमधील चित्रपटगृहात ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडण्याचा आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रयत्न केला होता. यादरम्यान जरासा राडाही झाला होता. याच प्रकरणावरून आव्हाडांवर गुन्हा दाखल झाला होता. शुक्रवारी सायंकाळी आव्हाडांना अटक झाली होती. दरम्यान या कारवाईचे पडसाद उमटले असून, रायुकाँतर्फे आंदाेलन करण्यात आले. जितेंद्र आव्हाड यांना सरकारकडून बेकायदेशीर अटक केल्याचा आराेप आंदाेलकांनी केला. काळ्या फिती लावून निषेधाच्या घोषणा करुण निषेध आंदोलन करण्यात आले. आंदाेलनात बुढन गाडेकर, आकाश धवसे, ताज नौरगाबादी, संदीप कांबळे, शुभम पिठलोड, अजय कांबळे, अविनाश वाहुरवाघ, अविनाश इंगळे, नितीन क्षिरसागर, कैलास कराळे, वैभव घुगे, अब्दुल नईम, मो. फिरोज, कृष्णा पाटील, रतन धवसे, हर्षल पारडे, सागर कुसबे, विकी बागडे, गोलू मालटे, सूरज सोदडे, चिकू राठोड, प्रविण खांबलकर आदींसह युवक पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संखेने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...