आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडांचा अडथळा दूर करुन अहवाल द्या:बाळापूर तालुक्यातील शेतरस्ता प्रकरण, एसडीओनी दिला तहसीलदारांना आदेश

अकोला12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाळापूर तालुक्यातील शेतरस्ता प्रकरणी झाडांचा अडथळा दूर करुन अहवाल सादर करा, असा आदेश उपविाभगीय अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिला. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात तरी शेतकऱ्यांना शेतात जाण्याच्या मार्गतील अडथळा दूर होऊन शेती करता येईल. गायगाव भाग-२ मध्ये ३.१४ मीटरचा एक रस्ता हा सरकारी शेतरस्ता असल्याचा दावा अजय रूईकर, श्रीराम कुटाफळे, विजय कुटाफळे, संजय कुटाफळे, अनिल कुटाफळे यांनी केला. मात्र हा शेतरस्ता बंद करुन त्यावर अतिक्रमण केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. सरकारी नकाशातही हा रस्ताच आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय, उच्च न्यायालय व पुन्हा तहसील कार्यालयाचे उंबरठे ६ वर्षे झिजवले. मात्र हा रस्ता मोकळा झाला नव्हता. त्यामुळे त्यांनी लोकायुक्तांकडे धाव घेतली होती. शेतरस्त्यात झाडे असून, याबाबत अर्जदार, तहसील, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात पत्रव्यवहार झाला. अर्जदारांनी वनविभागाला २६ नोव्हेंबरला पत्र दिले. झाडांमुळे शेतरस्त्यांत अडथळा होत असून, रस्ता मोकळा करण्याचा उल्लेख केला होता. मात्र यातील एका झाडावर खसरा मालकाचा हक्क असल्याचा दावा करीत याबाबत मालकाचा अर्ज आवश्यक असल्याचे वनविभागाने नमूद केले होते. तहसीलने वनविभागाला ३० मार्चला पत्र दिले. शेतरस्ता मोकळा होण्यासाठी झाड तोडणे आवश्यक असून, याची कारवाई व्हावी, असेही तहसीलदारांनी स्पष्ट केले . उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या आदेशात नवपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या पत्राचा संदर्भ देत वृक्षतोड आदेशाची आवश्यकता नसल्याचे विषयात नमूद केले. शेतरस्त्यावरील निलगिरी, बोरीच्या झाडांचा अडथळा दूर करण्याची कारवाई करावी आणि अहवाल सादर करावा, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...