आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा रूग्णालय:बाधिताच्या संपर्कातील 15 जणांचे अहवाल निगेटिव्ह; प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असला तरी सोमवारी, २३ मे रोजी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजन करून बाधित रुग्णाच्या संपर्कातील १५ जणांचे नमुने चाचणीसाठी घेतले होते. हे सर्व जण निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे. दरम्यान संबंधित रुग्णाची प्रकृतीची ठणठणीत असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात येते. जिल्हा गेल्या दोन महिन्यांपासून कोविडमुक्त असतानाच २३ मे रोजी एका संदिग्ध रुग्णाचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेल्या या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात आला होता. शिवाय रुग्णाच्या घरी निर्जंतुकीकरण आणि प्रतिबंधात्मक मोहिम राबवण्यात आली होती. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १५ जणांचे नमुने वैद्यकीय चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. दरम्यान, राज्यासह देशाच्या अनेक भागात कोरोनाचे रुग्ण आढळत असून, कोविड नियंत्रणात आला असला तरी संपुष्टात आला नाही. त्यामुळे कोविड संबंधित लक्षणे आढळत असतील तर नागरिकांनी त्वरित वैद्यकीय तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चाचणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...