आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई - शालिमार दरम्यान 2 विशेष गाड्या:मुंबई मार्गावरील आरक्षण फुल्ल; गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय

अकोला15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल आहे. एक्सप्रेस गाड्यांना पंधरा दिवसांचे वेटिंग आहे. त्यामुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस आणि शालिमार दरम्यान विशेष शुल्कासह 2 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

29 जूनपर्यंत बदल

08101 समर स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 18 जून रोजी 10.00 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी 11.35 वाजता शालिमार येथे पोहोचेल.08102 समर स्पेशल शालिमार येथून 14 जून रोजी 03.35 वाजता सुटली. आणि तिसऱ्या दिवशी 04.05 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. दोन द्वितीय वातानुकूलित, एक तृतीय वातानुकूलित, 8 शयनयान आणि 2 द्वितीय आसन श्रेणीसह ब्रेक व्हॅन अशी गाडीची संरचना आहे. 29 जूनपर्यंत ही गाडी सुरू राहणार आहे.

असे आहेत थांबे

ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, वरणगाव (फक्त 08101 साठी), बोदवड, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, अजनी, नागपूर. तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देता येईल. आरक्षण: विशेष ट्रेन क्र. 08101 साठी बुकिंग विशेष शुल्कासह 15 जून रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल.

जनरलचे बुकिंग काढा

सध्या जनरल डब्यातून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना बुकिंग करावे लागते. त्यामुळे तत्काळ प्रवासासाठी रेल्वेप्रवास प्रवाशांना शक्य होत नाही. अशावेळी एसटी किंवा खासगी वाहनांची मदत घ्यावी लागते. यात प्रवाशांच्या खिशाला अधिक आर्थिक भुर्दंड पडतो. कोरोनाचा प्रकोप आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. त्यामुळे प्रवाशांचा विचार करून रेल्वेने जनरलच्या प्रवासासाठी वेळेवर तिकीटची व्यवस्था सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...