आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:दिव्यांगांना राखीव निधी त्वरित प्रदान करण्यात यावा; युवा स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने निवेदन

आगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायतच्या एकूण वार्षिक उत्पन्नापैकी ५ टक्के निधीचा विनियोग दिव्यांग व्यक्तीसाठी केला जातो. परंतु, अकोला जिल्ह्यांमध्ये अनेक ग्रामपंचायतीने अद्यापही दिव्यांगांचा निधी त्यांच्या खात्यात जमा केला नाही. यासाठी स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे तक्रार दाखल करण्यात आली.

यावेळी स्मरण पत्र देऊन पुन्हा विचारपूस केली असता उपजिल्हाधिकारी खडसे यांनी संबंधित अधिकारी तसेच यंत्रणेस तात्काळ फोन करून ३१ मार्चपर्यंत निधी जमा करण्याचे आदेश दिले आहे. तरीसुद्धा संबंधित अधिकारी किंवा यंत्रणेने १५ एप्रिलपर्यंत दिव्यांग व्यक्तीच्या खात्यावर निधी जमा नाही झाला तर स्वराज युवा प्रतिष्ठान संबंधित यंत्रणेच्या विरोधात १८ एप्रिल रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी मारोडी, आपातापा, अनकवाडी, घुसल, घुसरवाडी, म्हातोडी येथील अपंग बांधव उपस्थित होते. यावेळी स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राम पाटील म्हातोडीकर, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष धीरज सांगळे, जिल्हा अपंग जिल्हा अध्यक्ष जनार्दन बुटे, शहर अध्यक्ष शुभम पिपलोड, बाळापूर तालुका अध्यक्ष चेतन फुकट, घनश्याम भांडे, शंकर धनी, शंकर भांडे, नारायण गोरले, गजानन बोबळे, नितीन घावट, विश्वास घाबरट आणि मोठ्या संख्येने अपंग बांधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...