आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य नविासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी सोमवार, २ जानेवारी २०२३ पासून राज्यभरात संपाची हाक देण्यात आली आहे. या संपामध्ये अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ७० पेक्षा अधिक नविासी डॉक्टर्स सहभागी होणार आहेत. मात्र अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.राज्य नविासी डॉक्टरांच्या संघटनेच्या माहितीनुसार विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री गिरीश महाजन यांना नविेदन देण्यात आले आहे. अकोल्यातील डॉक्टर यामध्ये सहभागी होणार असल्याबाबत जीएमसी अधिष्ठाता तसेच विभाग प्रमुखांना माहिती दिली आहे.
गेल्या वर्षापासून संघटनेने विविध स्तरावर महाराष्ट्रातील नविासी डॉक्टरांच्या समस्या मांडून शासन व प्रशासनास माहिती करून देण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये राज्यपाल, वैद्यकीय शिक्षण मंत्री, संबंधित विभागाचे सचवि, आयुक्त व संचालक यांच्यासोबत संघटनेच्या अनेक बैठकी झाल्या. अनेकदा मागण्या मांडूनही फायदा झाला नाही. राज्यातील सर्व शासकीय, पालिका महाविद्यालयात अपुऱ्या व मोडकळीस आलेल्या वसतिगृहांमुळे विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड, वरिष्ठ नविासी डॉक्टरांच्या १४३२ जागांच्या पदनिर्मितीचा शासन दरबारी रखडलेला प्रस्ताव, सहयोगी व सहाय्यक प्राध्यापकांची अपुरी पदे तातडीने भरणे, १६ ऑक्टोबर २०१८ प्रमाणे लागू झालेल्या तारखेपासून महागाई भत्ता तत्काळ अदा करण्यात यावा आदी विविध प्रमुख मागण्या केल्या असल्याचे नविासी डॉक्टरांनी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.